शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

पुणे विमानतळावर पकडले ५१ लाखांचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 06:37 IST

अबुधाबीवरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या जेट विमानातील प्रवाशांच्या ट्रॉलीबॅगच्या आतील बाजूला तस्करी करून आणलेले ५१ लाख ३५ हजार रुपयांचे १़६३ किलोचे सोने

पुणे : अबुधाबीवरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या जेट विमानातील प्रवाशांच्या ट्रॉलीबॅगच्या आतील बाजूला तस्करी करून आणलेले ५१ लाख ३५ हजार रुपयांचे १़६३ किलोचे सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाने पकडले़ याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे़ ही सोने तस्करीची नवी मोडस उघडकीस आली आहे़ मोहंमद युसूफ (वय ४०, रा़ कर्नाटक) असे या प्रवाशाचे नाव आहे़ जेट एअरवेज हे विमान शनिवारी अबुदाबी येथून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले़ त्यातील एक प्रवासी मोहमंद युसूफ याच्याबरोबर एक महिला व लहान मुलगा होता़ त्यांच्याकडे २ ट्रॉली बॅग होत्या़ कुटुंबाबरोबर आलेल्या प्रवाशांची कडक तपासणी होत नाही, असा त्याचा समज होता़ जेव्हा त्याच्या बॅगा स्कॅन करण्यात आल्या़ तेव्हा येथील पोलिसांना संशय आला़ त्यांनी चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यावरून पोलिसांचा संशय आणखीच बळावला़ त्यांनी या ट्रॉलीची तपासणी केल्यावर त्याच्या हँडल, व्हिल व इनर लिगिनमध्ये आतल्या बाजूला सोने ठेवण्यात आल्याचे दिसून आले़ पोलिसांनी ती ट्रॉली खोलून पाहिली असता त्यात आतल्या बाजूला ठेवलेल्या सोन्याच्या तारा, गोल चकत्या आढळून आल्या़ हे सोने स्कॉनिंगमध्ये ओळखता येऊ नये, यासाठी त्यावर रोडियमचा पेंट लावण्यात आला होता़ याप्रकारे त्याने यापूर्वीही सोन्याची तस्करी केली आहे का,याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)रोडियम पेंटचा मुलामासोन्यावर रोडियम पेंटचा मुलामा दिल्यावर ते सोने आहे, असे वाटत नाही़ त्यामुळे अशा सोन्याच्या तारा, चिपवर रोडियम पेंट लावून युसूफ याने ती आपल्या प्रवासी बॅगेला असलेल्या व्हिलच्या आतमध्ये तसेच हँडलच्या आतल्या बाजूला हे सोने दडवले होते़ हे सोने अ‍ॅसिडमध्ये टाकल्यानंतरच त्यावरील पेंट निघून जातो व खाली उरते ते २४ कॅरेटचे सोने़ या नव्या मोडसचा वापर युसूफने केल्याचे उघडकीस झाले आहे़