शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

By admin | Updated: July 11, 2016 00:24 IST

श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

बारामती : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! हा बोध लक्षात घेऊन श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. हजारो वारकरीदेखील उपक्रमाचा घटक बनले आहेत. वारकऱ्यांच्या माध्यमातून या बीजांचे रोपण होणार आहे.बारामती तालुकामध्ये नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना सर्पदंश, तसेच सर्पांबद्दल असणारे समज-गैरसमज या विषयावर प्रबोधन केले जाते. तसेच सर्पदंशावर प्रथमोपचार यावर मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी माहितीपत्रक वाटले जातात. विसाव्यासाठीच्या जागा शोधून देण्यास मदत करतात. अडगळीच्या भागात तंबू लावले असतील त्या आजूबाजूचा परिसर वस्तीत तपासणी केली जाते. तसेच, विंचू, साप आदी प्राण्यांचा उपद्रव होऊ नये, यासाठी मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाची प्रेरणा युवावर्गाने घेतल्यास ५० हजार बियांची लागवड सहज होणे शक्य आहे. यापूर्वी संस्थेच्या युवकांनी थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जाऊन बियांचे रोपण केले आहे. पशुपक्ष्यांसाठी झाडे नितांत गरजेची आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तो आता कायमस्वरुपी राबविला जाणार आहे. आज ५० हजार बीजवाटपापैकी ५० टक्के झाडे उगवल्यास निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल. एका गावातून ५० हजार बीजवाटपाचा उपक्रम यशस्वी झाला. त्यासाठी युवकांचा सामूहिक सहभाग महत्त्वाचा ठरला. पालखी मार्गावरील ७५ टक्के गावांनी हा उपक्रम राबवल्यास दरवर्षी या बीजवाटपातून हरित मार्ग तयार होतील. हजारो ठिकाणी वृक्षारोपण होईल. लाखो वृक्ष उगवले जातील. आज आपण सर्वांनी एक संकल्पना मनात घेऊन एक एक पाऊल पुढे टाकत सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवावा, असे नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष बबलू कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या उपक्रमात कांबळे यांच्यासह श्रीकांत पवार, विवेक पांडकर, कार्तिक शहा, आनंद सोनवणे, सागर भंडारे, सोमेश बांदल, सोहम जोगळेकर, सचिन गायकवाड, डॉ. इ. ठ. जगताप आदींनी सहभाग घेतला.