शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

वृद्ध साहित्यिक, कलाकारांना पाच हजार रुपये मानधन देणार; राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 10:35 IST

१२५ कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी १२५  कोटी रुपये इतक्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या या योजनेत अ वर्ग कलावंतास ३१५०, ब वर्ग कलावंतास २७००, क वर्ग कलावंतास २२५० रुपये मानधन देण्यात येते.

  • मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास

सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी सुधारणा कायद्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या यासाठी तीन महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

  • ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मंडळ

ऑटो रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून ५० कोटी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या मंडळावर मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल आणि विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.

इतर महत्त्वाचे निर्णय

  • जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी भुलेश्वर येथील जागा ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. जैन इंटरनॅशनल ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित असून समाजाच्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. या संघटनेला १० हजार २५७ चौ.मी. जागा जिमखान्यासाठी देण्यात येईल. 
  • राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी (महाराष्ट्र हब) सिडको तसेच पनवेल महापालिका यांच्याकडून आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे सिडकोचे ४८ कोटी ९४ लाख तर पनवेल महापालिकेचे ४६ कोटी ९३ लाख रु. विकास शुल्क माफ करण्यात आले आहे.
  • विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी भाग भांडवल देणार.  महामंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ३ अशासकीय सदस्य आणि ७ शासकीय सदस्य असतील. 
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी, मेंढी आर्थिक  विकास महामंडळाचे भाग भांडवल २५ कोटी रुपयांवरून ९९ कोटी ९९ लाख रुपये केले. 
  • हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे तसेच यांत्रिक उपकरणे आणि स्वच्छता युनिट वाहने खरेदी करण्याच्या मशिनहोल योजनेस ५०२ कोटी रुपये खर्च करणार. 
  • १३८ जलदगती न्यायालयांसाठी ४७ कोटी २५ लाख इतक्या वाढीव खर्चास मान्यता.
  • राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मुंबईतील कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर. या इमारतीसाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
  • संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार. प्रत्येकी एक कोटी रुपये खर्चास तसेच आवश्यक त्या पदांना मान्यता.
  • तात्पुरत्या स्वरूपातील गट ब मधील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित. 
  • श्रीगोंदामधील (जि. अहमदनगर) शेती महामंडळाची २५२ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र उभारण्यास एमआयडीसीला दिली.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार