शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:00 IST

Maharashtra Police पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

- सचिन राऊत

अकोला : राज्यातील पोलीस प्रशासनातील तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण वाढल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापैकी २५० पदे सहायक पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती देऊन, विविध न्यायालयीन प्रकरण व सेवाज्येष्ठता यामधून हे पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून, गुन्हेगारीवरही याचा परिणाम होत असल्याचे वास्तव आहे.राज्यात जुलै महिन्यापर्यंत ४२० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात आणखी सुमारे १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात ५०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम गुन्हेगारीवर होत असल्याने २५० च्या आसपास पोलीस निरीक्षक पदे भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्या १०० व्या बॅचमध्ये ३११ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश असून, यामधील २५ अधिकाºयांना यापूर्वीच पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित अधिकाºयांच्या पदोन्नतीनंतर रिक्त असलेल्या ५०० पोलीस निरीक्षकांच्या जागेवर या सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू करण्यात आली होती; मात्र अचानकच कोविड-१९ आजाराने थैमान घातल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आणि ही पदोन्नतीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे या तीन महिन्याच्या कालावधीत आणखी काही पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले असून, त्याचाही ताण कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाºयांवर आला आहे. १०० पोलीस निरीक्षक आणखी होणार कमीराज्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या १०० पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांना शहर पोलीस उप-अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) या पदावर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या १०० पोलीस निरीक्षकांची आणखी पदे रिक्त होणार आहेत, त्यामुळे राज्यात पदोन्नतीच्या प्रकियेनंतरही सुमारे २०० पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. पीएसआय ते एपीआय यांचीही पदोन्नती थांबलीकोविड-१९ मुळे पोलीस उप-निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; मात्र मार्च महिन्यापासून ही प्रक्रियादेखील थांबली असल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस