शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
6
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
7
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
8
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
9
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
10
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
11
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
12
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
13
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
14
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
15
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
16
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
17
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
18
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
19
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
20
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

५०० ग्रामपंचायती झाल्या डिजिटल

By admin | Updated: August 16, 2016 01:41 IST

जन्म दाखल्यापासून आधार कार्डपर्यंत सर्व शासकीय सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्यात येत असून

मुंबई : जन्म दाखल्यापासून आधार कार्डपर्यंत सर्व शासकीय सेवा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्यात येत असून सध्या ५०० ग्रामपंचायती डिजीटल झाल्या आहेत. अशा प्रकारची कामगिरी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहले राज्य ठरले असून २०१८ अखेरपर्यंत राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायती डिजीटल नेटवर्कने जोडण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित माहिती तंत्रज्ञानविषयक सोहळ्यात विविध डिजीटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपले सरकार या पोर्टलवरील ‘महा योजना’ या नव्या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. सध्या ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून १५६ सेवा देण्यात येत असून आज त्यात आणखी ५० सेवांची भर घालण्यात आली. येत्या २ आॅक्टोबरपर्यंत सर्वच शासकीय योजना आॅनलाईन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. डिजिटल ग्रामपंचायतींमुळे ग्रामीण भागांतील मुलांसाठी ज्ञानाची दारे खुली झाली आहेत. जगातील सर्वोत्तम ज्ञान त्यांना घेता येणार आहे. यापुढील काळात राज्यातील प्रत्येक शासकीय शाळा, आश्रमशाळा, रुग्णालये इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहेत. ग्रामीण रुग्णालये क्लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून शहरातील मोठ्या रुग्णालयांशी जोडून त्यांच्या सेवा ग्रामीण भागात पुरविण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण सेवांमध्ये गुणात्मक फरक पडत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीची माहिती व्हावी, यासाठी काढण्यात आलेल्या सायबर सुरक्षा जागृती पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सायबर सिक्युरिटी संदर्भात जनजागृती करण्यासाठी क्विक हिल ही कंपनी राज्य शासनास मदत करणार आहे. यासंदभार्तील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. आपले सरकारमध्ये आजपासून समाविष्ट झालेल्या योजनांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच अपंगांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांची पुनर्मोजणी, दुय्यम गुणपत्रिका, दुय्यम पदवी प्रमाणपत्र, नवीन वीज पुरवठा अर्ज, सदोष विद्युत मीटर तक्रार आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट अँड सेफ नागपूरसाठी एल अँड टीबरोबर करारनागपूरला देशातील पहिले स्मार्ट अँड सेफ शहर बनविण्यासाठी एल अँड टी या कंपनी बरोबर करार करण्यात आला. नागपूरमध्ये सीसीटीव्ही आणि कमांड सर्व्हेलन्स यंत्रणा बसविण्यात येणार असून संपूर्ण शहरात हॉटस्पॉट बसवून वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. नागपूरप्रमाणेच नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती ही शहरे स्मार्ट करण्यासाठी एच.पी. या कंपनीबरोबर राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे. ही शहरे स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी एचपी १८०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.