लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातल्या एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याची प्रक्रिया संथ झाल्याचे चित्र आहे. अद्याप १ कोटी ५ लाख वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवण्यात आलेली नाही. उर्वरित निम्म्या वाहनांनी अद्याप एचएसआरपीसाठी अपॉइंटमेंट घेतलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात एकूण २ कोटी १० लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी ९३ लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे काम सध्या पूर्ण झाले आहे. तर १२ लाख वाहन धारकांनी वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे. दरम्यान, अद्याप १ कोटी ५ लाख जुन्या वाहनांनी एचएचआरपीसाठी नोंदणीही केलेली नाही. कारवाईबाबत साशंकता आणि कालमर्यादेबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने वाहनधारकांनी देखील एचएसआरपीकडे पाठ फिरवली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कंपनी नियुक्तीला मुदतवाढ
राज्यातील ६० प्रादेशिक-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडळात विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्युशन्स प्राईव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपन्यांची मुदत जानेवारी २०२६ मध्ये वाढवण्यात आली असून ती डिसेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : Half of older vehicles in Maharashtra still lack High-Security Registration Plates (HSRP). Ambiguity regarding deadlines leads to public reluctance. Of 2.1 crore old vehicles, 93 lakh have HSRPs. The deadline for the appointed companies is extended to December 2026.
Web Summary : महाराष्ट्र में अभी भी आधी पुरानी गाड़ियों में उच्च सुरक्षा पंजीकरण प्लेटें (एचएसआरपी) नहीं हैं। समय-सीमा के बारे में अस्पष्टता के कारण जनता हिचकिचा रही है। 2.1 करोड़ पुरानी गाड़ियों में से 93 लाख में एचएसआरपी हैं। नियुक्त कंपनियों की समय-सीमा दिसंबर 2026 तक बढ़ा दी गई है।