शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात काँग्रेसच्या ५० जनसंघर्ष सभा, आज दौलताबादेतून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:17 IST

जनसंघर्ष यात्रेनंतर आता काँग्रेस राज्यभर जनसंघर्ष सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ५० जनसंघर्ष सभा घेण्याची घोषणा पक्षाने केली असून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे गुरुवारी पहिली सभा होईल

मुंबई : जनसंघर्ष यात्रेनंतर आता काँग्रेस राज्यभर जनसंघर्ष सभा घेणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात ५० जनसंघर्ष सभा घेण्याची घोषणा पक्षाने केली असून औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे गुरुवारी पहिली सभा होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, केंद्रातील व राज्यातील नाकर्त्या व लोकविरोधी भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यभरात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेच्या माध्यमातून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून १२० विधानसभा मतदारसंघांत जाहीर सभा घेण्यात आल्या. सरकारविरोधातील संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी राज्यभरातील विविध शहरांमध्ये ५० जनसंघर्ष सभा घेण्यात येतील.या सभांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा व अपयशाचा पंचनामा केला जाईल. राज्यातील सर्व प्रमुख नेते व काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभांना संबोधित करतील, असेही चव्हाण म्हणाले.आज दुपारी २.०० वाजता दौलताबाद येथे पहिली सभा होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबाद शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवारी सकाळी १० वाजता पैठण येथे तसेच सायंकाळी ५.३० वाजता पुणे शहरात जनसंघर्ष सभा आयोजित करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस