शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:19 IST

मुंबई, दि. 31- मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ढिगाऱ्याखाली 60 ते ...

ठळक मुद्देसंपूर्ण अपघाताची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं आहेभेंडीबाजार इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून पाच लाख रूपयांची मदत केली जाणार आहे.

मुंबई, दि. 31- मुंबईतील जे जे मार्ग परिसरात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकल्याचा अंदाज मुंबई मनपाने वर्तविला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि फायर ब्रिगडेच्या जवानांना यश आले. या संपूर्ण अपघाताची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत म्हणून पाच लाख रूपयांची मदत केली जाणार आहे. यामध्ये तीन लाख रूपये मुख्यमंत्री निधीतून दिले जाणार आहेत तर दोन लाख रूपये मुख्यमंत्री विशेष निधीतून दिले जाणार आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्च  सरकार करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी होणार असून म्हाडाच्या उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली जाणार आहे आणि त्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे.या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये एकूण 9 कुटुंबे राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  ही इमारत १०० ते १२५ वर्षे जुनी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान कोसळेली इमारत सेस अंतर्गत येत असल्याची माहिती समोर आली आहे.  

एक नजर टाकूया घटनाक्रमावर भेंडी बाजार परिसरातील मौलाना शौकत अली रोडवरील बोरी मोहल्ला येथे 5 मजली हुसैनी नावाची इमारत कोसळलीसकाळी 8.30 वाजता : हुसैनी इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षास प्राप्तसकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं दुर्घटनेची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलीसकाळी 8.31 वाजता : अग्निशमन दलानं गाड्या घटनास्थळी रवाना केल्याची वेळसकाळी 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या 3 गाड्या, 2 फायर इंजिन व 1 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेसकाली 8.38 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 2 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आलेसकाली 8.42 वाजता : अग्निशमन दलाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार House Collapse Call Level 3 ची घर कोसळण्याची घटना असल्याचे घोषित करण्यात आलेसकाली 8.45 वाजता : राष्ट्रईय आपत्ती प्रदिसादक पथकाला कार्यान्वित करण्यात आलेसकाली 9.45 वाजता : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे 90 जवानांचे पथक घटनास्थळी दाखल

 हुसैनीवाला इमारत धोकादायक होती - पालकमंत्री सुभाष देसाई  दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटलं आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.  दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे            

टॅग्स :Accidentअपघात