शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

By मनोज गडनीस | Updated: January 7, 2024 05:55 IST

दिल्लीत सर्वाधिक १६९ घटना

मनोज गडनीस, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उड्डाणावेळी, धावपट्टीवर उतरताना वा हवेत असताना विमानाला पक्षी धडकण्याच्या घटनांत गेल्या काही वर्षांत वाढ झाली असून नुकत्याच सरलेल्या २०२३ मध्ये महाराष्ट्राच्या आकाशात एकूण १३१ पक्ष्यांनी विमानाला धडक दिली. तर दिल्लीत १६९ वेळा असा प्रकार घडला. देशभरात एकूण १०१७ घटनांची नोंद झाली. नुकसान भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांना तब्बल एक ते पाच कोटी रुपयांचा खर्च येतो. विमान अपघातांत पक्ष्याची धडक ही सर्वात गंभीर बाब आहे. सिम्युलेटरवर वैमानिकांना अशावेळी परिस्थिती कशी हाताळावी, याचे प्रशिक्षण दिले जाते. 

विमानतळाभोवती जास्त धोका

  • विमानतळ परिसर हा किमान २०० एकर किंवा त्यापेक्षा जास्त असतो. तिथे धावपट्टीखेरीज असलेल्या गवतामध्ये विविध प्रकारचे कीटक किंवा लहान-मोठे प्राणी असतात. त्यांच्या भक्षणासाठी पक्ष्यांचा तिथे वावर असतो. या संदर्भात डीजीसीएने नियमावली केली असून अशा प्राण्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी व पक्ष्यांना हाकलण्यासाठी पथके आहेत.
  • विमानतळ परिसरापासून १० किलोमीटर परिसरात मांसाहाराचे अवशेष आढळले तरी तिथे पक्षी येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कटाक्षाने स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

पक्षी अडकल्यास विमानाचा ताेल जाताे

विमान उडताना किंवा उतरताना पक्षी धडकला तर ते सर्वाधिक भीषण असू शकते. मुळात पक्ष्याचा आकार कितीही लहान असला तरी त्याची उडण्याची गती आणि विमानाची हवेतील गती या दोन गतिमान गोष्टी एकमेकांना धडकतात त्यावेळी ती धडक जबरदस्त बसते. त्यातून जर विमानाच्या पंखामध्ये पक्षी अडकला तर त्याचा थेट परिणाम विमानाचा तोल जाण्यात होतो. विमान हवेत ३० हजार किंवा तत्सम उंचीवरून उडत असते त्यावेळी अशी धडक झाली तर विमानाला सावरण्यासाठी त्याच्याकडे जागा असते. मात्र, विमान कमी उंचीवर असताना असा प्रकार घडला तर त्याची तीव्रता मोठी होऊ शकते.- मंदार भारदे, विमान वाहतूक व्यावसायिक

विमा कंपन्यांना मिळाला ४ हजार काेटींचा महसूल

सद्य:स्थितीत देशातील ७७१ महाकाय विमाने व ३०० च्या आसपास लहान विमाने अशा एक हजारांवरील विमानांसाठी चार हजार कोटी रुपयांच्या आसपास महसूल विमा कंपन्यांना मिळत आहे. यामध्ये केवळ तांत्रिक समस्यांवरील खर्चच कव्हर होत नाही तर पक्ष्याने धडकल्यामुळे होणारे नुकसानदेखील कव्हर होते. एखादा पक्षी विमानाला धडकला तर विमानाचा समतोल जाऊन ते कोसळण्याची शक्यता असते. 

टॅग्स :airplaneविमानMaharashtraमहाराष्ट्र