शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

...अन् ४५ मिनिटांनी धडधडले हृदय, प्रत्यारोपणाआधीच ठोके झाले सुरू

By admin | Updated: April 20, 2016 05:35 IST

डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ आजाराने ग्रस्त असलेल्या गुजरातच्या जयसुखभाई ठाकेर (३८) यांना चेन्नईला हृदयप्रत्यारोपणासाठी नेण्यात आले होते

मुंबई : ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ आजाराने ग्रस्त असलेल्या गुजरातच्या जयसुखभाई ठाकेर (३८) यांना चेन्नईला हृदयप्रत्यारोपणासाठी नेण्यात आले होते, पण हृदयप्रत्यारोपणाआधीच १३ जानेवारीला त्यांना ‘कार्डिएक अरेस्ट’ (हृदय बंद पडणे) आला. त्यानंतर, तब्बल ४५ मिनिटे त्यांच्या हृदयाचे ठोके बंद होते. कार्डिओपल्मनरी रेस्युसायटेशन (सीपीआर) प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली. पुन्हा-पुन्हा ही प्रक्रिया वापरून तब्बल ४५ मिनिटांनी हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले. त्यामुळे जयसुखभार्इंना जीवनदान मिळाले असून, त्यांची आता प्रकृती स्थिर आहे. येत्या काहीच दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. जयसुखभाई यांचा हृदयविकार शेवटच्या टप्प्यावर असल्याने हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे जयसुखभार्इंना गुजरातहून चेन्नईच्या फोर्टिस मलार रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू करून प्रकृती स्थिर करण्यात आली. त्याच दरम्यान, त्यांना कार्डिएक अरेस्ट आल्यामुळे त्यांचे हृदयाचे ठोके बंद पडले. कार्डिएक अरेस्ट आल्यानंतर डॉक्टरांनी हृदयाचे ठोके सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के.आर. बालकृष्णन यांच्या चमूने जयसुखलालभाई यांना ‘एक्स्ट्राकॉर्पाेरल मेंब्रेन आॅक्सिजिनेशन (इसीएमओ) मशीन’वर ठेवले. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसाचे कार्य सुरू राहण्यास मदत झाली, तर दुसरीकडे त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यात आले. या ‘कुलिंग प्रोजिसर’मुळे रुग्णाचा मेंदू कार्डिएक अरेस्टच्या काळात सुरक्षित राहण्यास मदत झाली, असेही डॉ. बालकृष्णन यांनी सांगितले. तब्बल ४५ मिनिटांनी त्यांच्या हृदयाची धडधड पुन्हा सुरू झाली आणि जवळपास मृतावस्थेत गेलेल्या जयसुखभार्इंना जीवनदान मिळाले. तब्बल १० दिवस ते कोमामध्ये होते, नंतर ते शुद्धित आले. त्यानंतरही काही दिवस त्यांना ‘आर्टिफिशिअल हार्टपंप’चा आधार देण्यात आला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. २९ जानेवारी रोजी त्यांना हृदयदाता मिळाल्यावर त्यांचे हृदयप्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)