शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

४४० व्यापाऱ्यांवर जप्तीची तयारी

By admin | Updated: March 26, 2015 00:04 IST

एलबीटीप्रश्नी एप्रिलमध्ये कारवाई : नोटिसीची मुदत संपताच आयुक्त रस्त्यावर

सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी व्यापाऱ्यांना वारंवार नोटिसा बजाविल्या आहेत; पण या नोटिसांना त्यांनी आजअखेर केराची टोपली दाखवत असहकार आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे महापालिकेने कडक पावले उचलत एलबीटीला प्रतिसाद न देणाऱ्या ४४० व्यापाऱ्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीची तयारी चालविली आहे. जप्तीपूर्व नोटिशीची मुदत एक एप्रिलला संपत असून, दोन एप्रिलपासून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होणार असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन दोन वर्षे होत आली आहेत, मात्र व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन हाती घेत एलबीटी भरण्यास नकार दिला. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे व्यापाऱ्यांवरील कारवाईला खीळ बसली होती. विधानसभा निवडणुकीनंतर प्रशासनाने एलबीटी वसुलीसाठी जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी व कर भरण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करून रक्कम भरण्याची नोटीस बजाविली. या दोन्ही नोटिशींना व्यापाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेने व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याची प्रक्रिया हाती घेतली, तसेच ५० व्यापाऱ्यांवर जिल्हा न्यायालयात फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करू नये, अशी सूचना आयुक्त अजिज कारचे यांना केली. त्यामुळे फौजदारीची प्रक्रिया थांबली होती. एक एप्रिलपासून एलबीटी रद्द होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती; पण तीही फोल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी चालविली आहे.पालिकेने विक्रीकर विभागाकडून व्यापाऱ्यांच्या खरेदी-विक्रीची माहिती घेऊन त्यांच्याकडे थकीत एलबीटीचे निर्धारण केले. त्यानुसार नऊ हजार व्यापाऱ्यांना मागणी बिले देण्यात आली. त्यापैकी ४४० व्यापाऱ्यांना एलबीटी न भरल्यास जप्तीची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजाविली आहे. या नोटिशीपोटी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत एक एप्रिलला संपत आहे. त्यानंतर दोन एप्रिलपासून व्यापाऱ्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई हाती घेतली जाणार असल्याचे संकेत बुधवारी महापालिका सूत्रांनी दिले. (प्रतिनिधी)महापौर जोरात, आयुक्त कोमातएलबीटी वसुलीसाठी महापौर विवेक कांबळे यांनी पदभार हाती घेतल्यापासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या आठवड्यात वसुलीसाठी ते अधिकाऱ्यांसह बाजारपेठेत उतरले होते. एलबीटी वसुलीचे अधिकार आयुक्त अथवा उपायुक्तांपेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्याला आहेत. उपायुक्तांच्या नावे आदेश काढून आयुक्तांकडून दुकानांची झडती, साठा व कागदपत्रे जप्तीची कारवाई होऊ शकते; पण आयुक्तांकडून केवळ कागदपत्रे रंगविण्यातच वर्ष सरले आहे. त्यांच्या मवाळ भूमिकेमागे स्थानिक राजकारण्यांसोबतच शासनाचा दबावही कारणीभूत आहे; पण आता परिस्थिती बदलली आहे. सत्ताधारी काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांचे नगरसेवक एलबीटी वसुलीसाठी प्रशासनाच्या पाठीशी आहेत. तरीही कारवाईचा जोर प्रशासकीय पातळीवर चढलेला दिसत नाही. २१ मे २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरूव्यापाऱ्यांचा एलबीटीवर बहिष्कारदोन वर्षांत १७० कोटींचा एलबीटी थकीतनऊ हजार व्यापाऱ्यांना विवरणपत्रासाठी नोटिसा४४० व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसादोन एप्रिलपासून जप्तीची कारवाई शक्य