राज्यातील ४४ टोलनाके बंद

By admin | Published: June 9, 2014 08:41 PM2014-06-09T20:41:32+5:302014-06-09T20:41:32+5:30

राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

44 tollnas closed in the state | राज्यातील ४४ टोलनाके बंद

राज्यातील ४४ टोलनाके बंद

Next

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - राज्यभरात १२६ टोलनाके असून त्यापैकी ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लुडी) ३४ टोलनाक्यांचा समावेश असून इतर १० टोलनाके एमएसआरडीसीचे आहेत. या व्यतिरिक्त ८२ टोलनाके सुरू राहणार आहेत. ग्रामीण भागातील व कमी अंतरावर असणारेटोलनाके बंदकरण्यात आले आहेत. ज्या टोलनाक्यांचा कालावधी कमी आहे अशा टोलनाके तात्काळ बंद करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे, लहान वाहनं टोलमुक्त करण्याच्या विचारात सरकार आहे. टोल रद्द झाल्याने एसटीच्या तिकिट दरवाढीलाही चाप बसण्याची शक्यता आहे. तर राज्यभरात टोल विरोधी आंदोलनासाठी गाजलेल्या कोल्हापूरसाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नेमली आहे. या तज्ञांच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आपण सहा महिन्यांपूर्वीच अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवला असून अर्थखात्याच्या दिरंगाईमुळे हा निर्णय रखडला असल्याचे त्यांनी म्हटले.

 

Web Title: 44 tollnas closed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.