शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर अवतरणार ४४ हजार ग्रामपंचायती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:58 IST

व्हिलेज बुक : विकासकामांची माहिती होणार अपडेट; नगर जिल्ह्यात राबविला प्रकल्प

साहेबराव नरसाळे

अहमदनगर : राज्यातील ४४ हजार ग्रामपंचायतींची माहिती लवकरच फेसबुक टाकली जाणार आहे. राज्य सरकारने व्हिलेज बुक ही संकल्पना हाती घेतली असून, सर्व ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात येत आहेत़ व्हिलेज बुक शब्दापुढे गावाचे नाव टाकून प्रत्येक गाव, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे प्रत्येकाचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ अहमदनगर जिल्ह्यातील १ हजार ३१३ ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ त्यावर शासनाच्या योजना, गावातील विकास कामांची माहिती, प्रकल्प, रस्ते, ग्रामबैठका आदी माहिती अपलोड करण्यात येणार आहे़ सरकारने फेसबुककडे तांत्रिक मार्गदर्शन मागविले होते़ त्यानंतर व्हिलेज बुक संकल्पना हाती घेण्यात आली. 

थेट संवादाची सुविधाग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे पेज चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  त्यावरून अधिकाऱ्यांशी थेट संवादही साधता येणार आहे़ मुख्यमंत्री, मंत्रालयातील अधिकारीही या पेजचा वापर करुन थेट गावाशी संवाद साधू शकतील, अशी माहिती ‘आपले सरकार’ योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक विठ्ठल आव्हाड यांनी दिली़

तक्रारीही करा ऑनलाइनफेसबुक पेजवरून नागरिकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे थेट तक्रारी, सूचना करता येतील. त्यांची दखल घेण्याचे निर्देशही सरकारने दिले.

टॅग्स :Facebookफेसबुक