शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चार हजार; केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 07:09 IST

ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मनोज माेघे -

मुंबई : वर्षभरात लागणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनहीकेंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे. ही यादी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

राज्य सरकारकडून कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, पीकविम्याऐवजी नुकसानभरपाईसाठी अनुदान यासारख्या योजनांद्वारे लाभ दिला जात आहे. त्याही पुढे जात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ची घोषणा करण्यात आली. 

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रूपये जमा होतात. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे १३ हप्ते म्हणजे २६ हजार रूपये जमा झालेत. त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रूपये जमा होणार आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य मिळून १२ हजार रूपये वर्षाला जमा होणार आहेत. 

निधीची तरतूदकोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.  त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

लाभार्थ्यांच्या संख्येला कात्रीकेंद्राच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून १ कोटी १५ लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरले. मात्र करपात्र तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाल्याचे लक्षात येताच या यादीला कात्री लावण्यात आली. 

लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सरकारने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांकडून भूमिअभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. या छाटणीत अनेक शेतकरी अपात्र ठरले आणि ही संख्या ८१ लाखांपर्यंत खाली आली. त्यामुळे आता ही अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार