शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

क्रुझवर ४० हजार कर्मचारी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 05:21 IST

‘लॉकडाऊन’मुळे कोंडी : सरकारकडे मदतीची हाक

नवी दिल्ली : कोरोनामुळे वाहतूक बंद झाल्याने मालवाहू जहाजे व पर्यटनासाठीच्या क्रुझशिपवर काम करणारे भारतातील चालक, कर्मचारी व खलाशी असे सुमारे ४० हजार जण जगाच्या विविध समुद्रांमध्ये नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजांवर अडकून पडले आहेत. यापैकी १५ हजार चालक, कर्मचारी व खलाशी सुमारे ५०० मालवाहू जहाजांवर तर आणखी २५ हजार क्रुझशिपवर आहेत.

घरीही परत येता येत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. या दर्यावर्दी कर्मचाऱ्यांच्या ‘एनयूएसआय’, ‘एमयूआय’ व ‘एमएएसएसए’ इत्यादी संघटनांनी नौकानयन मंत्रालयाकडे हा प्रश्न मांडला असून, सध्याचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर त्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने त्यांना दिले आहे.

‘मारिटाइम असोसिएशन आॅफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अ‍ॅण्ड एजन्ट््स’चे (एमए एसएसए) कार्यकारी अधिकारी कॅप्टन शिव हळबे यांनी सांगितले की, जहाजांवर अडकून पडलेल्या या सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची नोकºयांची कंत्राटे संपली आहेत. ते म्हणाले की, या लोकांची समस्या आम्ही नौकानयनमंत्री मनसुखलाल मांडविया यांच्यापुढे मांडली. ‘लॉकडाऊन’ संपल्यावर या लोकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मात्र परत आल्यावर या लोकांच्या चाचण्या घेऊन त्यानुसार त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागेल.

‘नॅशनल युनियन आॅफ सीफेअर्स आॅफ इंडिया’चे (एनयूएसआय) सरचिटणीस अब्दुलगनी सारंग यांंनी सांगितले की, कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणीत असताना आमची संघटना जहाज कर्मचाºयांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने जेवढे काही करता येईल तेवढे नक्कीच करेल. संघटनेने १० कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.गोमंतकीय ८००० खलाशी अडचणीतसुशांत कुंकळयेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : विदेशात अडकलेल्या गोव्यातील सुमारे ८ हजार खलाशांच्या कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एकट्या मियामी शहरातच सुमारे ४ हजार गोमंतकीय अडकले असून, त्यांना लवकर तिथून बाहेर काढा यासाठी गोवा सरकारवर दबाव आणला जात आहे. जगातील एकूण खलाशाांमध्ये भारतीय ४३ टक्के असून या भारतीयांमध्ये ७० टक्के प्रमाण गोवेकारांचे आहे. अजूनही सुमारे ८००० गोवेकर खलाशी एकतर बोटीवर किंवा विदेशी भूमीवरील हॉटेलात अडकून पडले आहेत. गोअन सीफेअर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ म्हणाले, एका मियामी शहरातच ५ बड्या कंपन्यांची जहाजे अडकली असून त्यात अडकलेल्या भारतीयांची संख्या १३ हजारांच्या आसपास असावी. त्यातील सुमारे ४००० गोवेकर आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या