शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४० हजार गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे: देशात प्रथमच भूमापनासाठी ड्रोनचा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 11:55 IST

ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे गावठाण मोजणीचा पथदर्शी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला.

ठळक मुद्देमंत्रिमंडळाकडून मंजूरी : २७० कोटी रुपये खर्च येणारकमी वेळात,कमी श्रमात व कमी मन्युष्यबळाचा वापर करून मोजणी काम पूर्ण करता येणारबांधीव क्षेत्र व खुली जागा यांची माहिती उपलब्ध असल्याने तात्काळ कर आकारणी करणे सुलभ होणार

पुणे: राज्यातील सुमारे ४० हजार गावाच्या गावठाणाचे भूमापन गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. मात्र,कमीत कमी वेळेत व कमी मनुष्यबळात गावठाण भूमापनाचे काम ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. राज्यमंत्री मंडळाने मंगळवारी त्यास मंजूरी दिली आहे.त्यासाठी सुमारे २७० कोटी रुपये खर्च येणार असून देशात या पध्दतीने प्रथमच मोजणी केली जाणार आहे.राज्यातील एकूण ४३ हजार ६६४ गावांमध्ये ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून अधिकार अभिलेख 7/12 उतारा उपलब्ध आहे. तर गावठाणातील घरांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून गावठाणातील भूमापन करून नकाशा व मिळकत पत्रिका दिली जाते. मात्र, महसूल विभागाकडील अपु-या मनुष्यबळामुळे आत्तापर्यंत राज्यातील केवळ ३ हजार ९३१ गावांच्या गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३९ हजार ७३३ गावांचे गावठाणाचे भूमापन करून प्रत्येक जागा धारकास नकाशे व मिळकत परित्राक तयार करणे सध्याच्या मनुष्यबळाच्या व जुन्या पध्दतीनुसार अशक्य आहे. त्यामुळे गावठाणाच्या भूमापनाचे काम ड्रोन  तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व्हे ऑफ ख संचालक कार्यालयाने ग्रामविकास विभागामार्फत शासनास सादर केला होता. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे गावठाण मोजणीचा पथदर्शी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला.त्यामुळे राज्यातील उर्वरित गावठाणांचे भूमापन ड्रोनच्या मदतीने करण्यास मंजूरी मिळावी,याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.त्यास मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्याने भूमापनात अधिक पारदर्शकता येणार आहे.----------ड्रोनच्या मदतीने भूमापन केल्याचे फायदे* गावातील प्रत्येक भूखंड धारकास त्याच्या भूखंडाचा नकाशा व मालकी हक्काचा पुरावा म्हणून मिळकत पत्रिका उपलब्ध होणार.* पारंपरिक मोजणी पध्दतीपेक्षा कमी वेळात,कमी श्रमात व कमी मन्युष्यबळाचा वापर करून मोजणी काम पूर्ण करता येणार.* कामात पारदर्शकता व अचूकता येणार * थ्रीडी इमेज प्राप्त होत असल्यामुळे विविध विकास यंत्रणांना व विभागांना नियोजन करणे सुलभ होणार .* घराचे बांधीव क्षेत्र व खुली जागा यांची माहिती उपलब्ध असल्याने तात्काळ कर आकारणी करणे सुलभ होणार.* मिळकत पत्रिका ग्रामपंचायतीस कर आकारणीस उपयुक्त ठरेल.*  शासकीय व ग्रामपंचायत जागेचे नकाशे उपलब्ध असल्याने संरक्षण करणे सोयीचे होणार.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार