मतदारांना पाठवण्यात आलेली 4 लाख पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’

By admin | Published: September 2, 2014 01:28 AM2014-09-02T01:28:37+5:302014-09-02T01:28:37+5:30

मतदार यादीतून वगळलेल्या नावांमुळे लोकसभा निवडणुकीत उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे.

4 lakh letters sent to the voters 'Undelived' | मतदारांना पाठवण्यात आलेली 4 लाख पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’

मतदारांना पाठवण्यात आलेली 4 लाख पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’

Next
चेतन ननावरे - मुंबई
मतदार यादीतून वगळलेल्या नावांमुळे लोकसभा निवडणुकीत उडालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. कारण यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना पुन्हा नावनोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिका:यांनी धाडलेल्या पत्रंपैकी 4 लाख 28 हजार 636 पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’ होऊन परत आली आहेत.
याआधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ‘स्यु मोटो’ कारवाई करत मुंबई शहरामधील 1क् मतदारसंघांतील 6 लाख 5 हजार 626 मतदारांची नावे यादीतून वगळली होती. त्यामुळे ऐन मतदानादिवशी लाखो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्याची नाराजी मतदारांसह राजकीय पक्षांनीही व्यक्त केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने नावे वगळलेल्या मतदारांना 24 जूनपासून स्मरणपत्रे पाठवण्यास सुरुवात केल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले.
पाटोळे म्हणाल्या, ‘यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना स्पीड पोस्टमार्फत नावनोंदणी करण्याचे आवाहन करणारे पत्र धाडण्यात आले आहे. शिवाय पत्रसोबत नावनोंदणी करण्याचा अजर्ही पाठवण्यात आला आहे. मतदारांना केवळ यादीतून आपले नाव वगळले आहे की नाही, याची खात्री करून तो अर्ज भरून द्यायचा आहे. पोस्ट विभागाने निवडणूक कार्यालयाला दिलेल्या माहितीनुसार आतार्पयत एकूण 6 लाख 5 हजार 626 पत्रे पोस्ट विभागाकडे देण्यात आली. पोस्ट विभागाने टप्प्याटप्प्याने एकूण पत्रंपैकी 4 लाख 84 हजार 22 पत्रे वितरित केली आहेत. वितरित पत्रंपैकी 55 हजार 386 पत्रे योग्य पत्त्यावर वितरित झाली असून विविध कारणांस्तव 4 लाख 28 हजार 636 पत्रे ‘अनडिलीव्हर्ड’ झाली आहेत. 1 लाख 21 हजार 6क्4 पत्रे टप्प्याटप्प्याने वितरित होणो बाकी आहे.’
‘मतदारराजा जागा हो!’
स्पीड पोस्टमार्फत धाडलेली पत्रे अनडिलीव्हर्ड झाल्याने पुन्हा उपजिल्हा निवडणूक अधिका:यांच्या कार्यालयात येऊन पडत आहेत. जमा झालेल्या पत्रंच्या गठ्ठय़ांमुळे कार्यालयाला गोदामाचे स्वरूप आले आहे. लोकसभा निवडणुकीत यादीतून नावे वगळल्याकारणाने मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी यादीत नाव आहे की नाही, ते तपासून तत्काळ नावनोंदणी करण्याचे आवाहन पाटोळे यांनी केले आहे. 
 
मतदारसंघपोहोचलेली पत्रेअनडिलीव्हर्ड पत्रे
धारावी1,8क्क्48,779
सायन-कोळीवाडा1,1क्क्42,11क्
वडाळा1क्,क्9245,245
माहीम4,43528,56क्
वरळी6,32531,4क्क्
शिवडी4,5क्क्16,744
भायखळा4,75637,587
मलबार हिल4,6क्क्18,648
मुंबादेवी9,13726,क्93
कुलाबा8,64138,67क्
एकूण55,3864,28,636 
 
पत्रंसाठी कोटय़वधी 
रुपयांचा खर्च
दरम्यान, मुंबई शहराप्रमाणोच मुंबई उपनगर, ठाणो व पुणो जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत अशाप्रकारे मतदारांना स्मरणपत्रे धाडण्यात आली आहेत. या चार जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत 81 मतदारसंघांचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत या 81 मतदारसंघांतून सुमारे 26 लाख 1क् हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. या सर्व मतदारांना स्पीड पोस्टमार्फत पत्रे धाडण्यासाठी प्रशासनाला सुमारे 3 कोटी 3क् लाख रुपयांचा खर्च आला आहे. 

 

Web Title: 4 lakh letters sent to the voters 'Undelived'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.