शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची चार कोटींची बिले प्रलंबित; संपकाळातील प्रस्तावावर अद्यापही निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:13 IST

एसटी महामंडळात सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘प्रवाशांसाठी सेवा’ जे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी अखंडपणे सेवा बजावत असले तरीही सेवेदरम्यान आलेले आजारपण तसेच अपघातामुळे उपचारावर होणारा खर्च कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात महामंडळाकडून दिरंगाई होत आहे. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची बिले मिळतात, परंतु, साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता. या संपकाळातील चार कोटींहून अधिक रकमेच्या बिलांवर अद्यापही निर्णय झालेला नाही.

एसटी महामंडळात सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपणात केलेला खर्च महामंडळाकडून दिला जातो. यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. तथापि, प्रस्ताव सादर केल्यानंतरही बिल निघण्यासाठी महिनोमहिने  वाट पाहावी लागते. सहा ते आठ महिने बिल निघतच नाही. कधी कधी वर्ष उलटून गेल्यानंतरही बिल मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  दरम्यान,  वैद्यकीय बिलासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतरही तो मंजूर होईलच याची शाश्वती नसते. यामध्येही अनेक अटी, शर्ती आहेत. आजारपणावर केलेला खर्च महामंडळाकडून मिळावा, अशी अपेक्षा असते, परंतु अनेकदा होत नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आपण वेतन दिलेले नाही. त्यामुळे वैद्यकीय बिलाबाबत आपण निर्णय घेतल्यास अडचणीत येऊ, असे एसटी महामंडळ प्रशासनाला वाटत आहे. आम्ही म्हणायलाच शासकीय सेवेत आहोत. इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. दोन महिन्यांतून एकदा पगार घ्यावा लागतो, अशी स्थिती आहे. वैद्यकीय बिलेही लवकर काढली जात नाहीत, अशी खंत एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवली. 

सामाजिक दृष्टिकोन ठेवून एसटी महामंडळाने बिले मंजूर करण्याची सवलत दिली आहे. कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ मिळतो, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या साडेपाच महिन्यांच्या संप काळातील वैद्यकीय बिले निर्णयाविना पडून आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून अशी बिले प्रलंबित ठेवणे चुकीचे असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या बिलाची रक्कम मिळाली पाहिजे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस. 

टॅग्स :state transportएसटी