सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या सुभाष चौक शाखेत १०० रुपयांच्या ९ बनावट नोटा आढळल्याची घटना ताजी असतानाच नई जिंदगीतील हॉटेल रसिकसमोर एकाकडे एक हजार रुपयांच्या ३९ बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री एकास अटक केली आहे. महिबूब उर्फ दौला अ. रशीद बागवान असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ३० सप्टेंबर रोजी महिबूब याने शहानवाज अ. वहाब शेख याच्याकडून हजारच्या ३९ नोटा घेतल्या. भारतीय चलनातील या नोटा बनावट असतानाही तो त्या चलनात आणण्याचा विचार करीत होता.
३९ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या
By admin | Updated: October 8, 2015 02:08 IST