शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत गोरगरिबांच्या उपचारांवर ३८८ कोटी खर्च

By admin | Updated: July 16, 2017 01:24 IST

‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. सेवाभावी कामांनाही विलंब लागतो वा काम न होण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जाते, पण चांगले काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. सेवाभावी कामांनाही विलंब लागतो वा काम न होण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जाते, पण चांगले काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल, तर सरकारी भितींनाही कसा ओलावा येतो, त्याचे अनोखे रूप पाहायला मंत्रालयातला सातवा मजला गाठायला हवा. गेल्या दोन वर्षांत सातव्या मजल्यावरून राज्यातील हजारो रुग्णांना तब्बल ३८८ कोटी रुपयांचे उपचार मोफत मिळाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १५ हजार रुग्णांना १५0 कोटी मिळाले. औषधोपचारासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट यांच्याकडून पाच पंचवीस हजारांच्या मदतीसाठी धडपड चालू असते. मुख्यमंत्री निधीतून मदत मिळेलच, याची खात्री नसायची. पूर्वी वर्षाला सुमारे ४ कोटींची मदत मिळत असे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊ न ओमप्रकाश शेटे यांची खासगी ओएसडी म्हणून नेमणूक केली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी नियमांचे अडथळे दूर करत गरिबांना उपचारासाठी सहज लाखभर रुपये मिळू लागले. वर्षाला १५० कोटींपर्यंतचा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून खुला झाला आहे. धर्मादाय आयुक्तालयामार्फत ५० हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न व १ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना मोफत, सवलतीत उपचारासाठी निधी दिला गेला. शेटे यांनी ४५० पेक्षा अधिक धर्मादाय रुग्णालयांना २० टक्के राखीव खाटा गरिबांसाठी ठेवण्यास भाग पाडले. परिणामी, २०१५ मध्ये या रुग्णालयांतर्फे १७९ कोटींचे, २०१६ मध्ये २०९ कोटी खर्चाचे उपचार विनाशुल्क झाले. अशा रुग्णांची संख्या पाच लाखांच्या घरात आहे. आधी मुख्यमंत्री निधीतून कमाल २५ हजारांची मदत मिळत असे. १३ आॅगस्ट २०१५ पासून ती २ लाखांपर्यंत वाढविली. जानेवारी २०१६ मध्ये हा आकडा ३ लाखांपर्यंत केला. शिवाय मंत्री, आमदार त्यांच्या निधीतून आरोग्य शिबिर, टूडी ईकोसारखे मशिन मिळवून देण्याचे कामही हा विभाग करत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची अनास्थाप्राथमिक आरोग्य केंद्रांची व जिल्हा रुग्णालयांची अनास्था या निमित्ताने समोर येत आहे. ही केंद्रे सक्षम असती व तेथे योग्य उपचार मिळाले असते, तर मुख्यमंत्री निधीवरील भार कमी झाला असता, असाही दृष्टिकोन यामागे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी किती प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या, याची आकडेवारी मागितल्यास विदारक चित्र समोर येईल.