शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

३७ लाख शेतकऱ्यांना देणार धान्याऐवजी पैसे; शासनाकडून आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:36 IST

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३७ लाख शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख पैसे देण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिलाभार्थी १५० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील. जानेवारी २०२३पासून योजनेची अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी तूर्त ५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी सदर शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने गहू आणि तीन रुपये किलोने तांदूळ दिला जात होता. मात्र, जवळपास एक वर्षापासून ही योजना बंद होती. कारण अन्न महामंडळाने धान्य पुरवठ्यास नकार दिला होता.  आता दरवर्षी आधारभूत किमतीत वाढ झाल्यास रोख रकमेतही वाढ होणार आहे. 

...असे आहेत निकष या योजनेत २४ जुलै २०१५ च्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट करण्यासाठी केशरी एपीएल शेतकरी कुटुंबाला ऑफलाइन, ऑनलाइन स्वरुपात अर्ज भरावा लागणार आहे.  ही माहिती तालुकास्तरीय डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या माध्यमातून भरली जाणार आहे. अर्जांची छाननी तहसीलदार करतील. या योजनेत मयत अथवा गाव सोडून गेलेले लाभार्थी वगळण्याच्या सूचना आहेत. यानंतरच यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे.  पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते करण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. कार्डमध्ये महिला कुटुंबप्रुमख असल्यास अशा कार्डमध्ये महिलाप्रमुखाला बँक खाते काढावे लागणार आहे.

या १४ जिल्ह्यांत होणार अंमलया योजनेत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी