मुंबई : आलीशान बीएमडब्ल्यू मोटार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने फसवणुकीने घेतलेले ३६ लाख रुपये अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर याला परत मिळाल्यानंतर, सचिनने या महिलेविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदविलेली फौजदारी फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.एरवी ५४ लाख रुपये किंमत असलेली बीएमडब्ल्यू मोटार स्वस्तात देते, या अनघा कार्तिक बोरीकर या महिलेने मारलेल्या भूलथापांना बळी पडून, सचिनने गेल्या वर्षभरात तिला एकूण ३६ लाख रुपये वेगवेगळ््या वेळेला दिले होते. मात्र, या प्रकरणी आपली फसवणूक झाली, असे लक्षात आल्यावर सचिनने अनघाविरुद्ध गेल्या वर्षी २० नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. न्यायालयबाह्य तडजोड झाली. त्यानंतर, दोघांनी या तडजोडीचा मसुदा न्यायालयात सादर केला व फिर्याद रद्द करावी, अशी विनंती केली होती. (विशेष प्रतिनिधी)
गमावलेले ३६ लाख सचिनला मिळाले परत
By admin | Updated: June 24, 2016 05:21 IST