शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पांढऱ्या पाठीची, लांब चोचीची ३४ गिधाडे हरयाणातून महाराष्ट्रात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:53 IST

तीन व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रात होणार संवर्धन

मुंबई - जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत हरयाणातील पिंजोर येथून लांब चोचीची २० आणि पांढऱ्या पाठीची १४ गिधाडे महाराष्ट्राच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी या पक्ष्यांचे बीएनएचएसच्या पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून राज्यात स्थानांतर करण्यात येत आहे.

हरयाणा वन विभाग, महाराष्ट्र वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस), केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) आणि वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली आहे. हरयाणाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक सक्सेना, महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास राव आणि बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र वन विभाग व बीएनएचएसची एक चमू सोमवारी पिंजोर येथे पोहोचली. यामध्ये रुंदन काटकर, डॉ. मयांक बर्डे, मनन सिंग महादेव यांचा समावेश आहे.

येथे होणार स्वागत

ताडोबामधील प्रभूनाथ शुक्ला, पेंच व्याघ्र प्रकल्पातील किशोर मानकार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदर्श रेड्डी यांनी व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रांना त्यांच्या स्वागतासाठी तयार करून ठेवले आहे. आनंद रेड्डी, भारत हाडा, जयकुमारन यांनी पक्ष्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण केल्या.

वातानुकूलित वाहनातून प्रवास...

नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तंदुरुस्त गिधाडं निवडण्यात आली. प्रजातीनुसार त्यांची महाराष्ट्रातील तीन व्याघ्रप्रकल्पांसाठी निवड झाली. प्रवासादरम्यान प्रत्येक गिधाड हे विशेष लाकडी पेटीत ठेवण्यात आले. त्यांना तीन वातानुकूलित टेम्पो ट्रॅव्हलरमधून आणण्याचे नियोजन करण्यात आले.

देशात चार प्रजनन केंद्रांवर ८०० गिधाडांची पैदास

देशातील गिधाडांची संख्या घटत असल्याने २००२ साली  ‘गिधाड प्रजनन’ कार्यक्रम सुरू करण्यात आला. याअंतर्गत चार प्रजनन केंद्रांवर ८०० गिधाडांची पैदास करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेत ताडोबा, पेंच व मेळघाट येथे विशेष केंद्र उभे केले. याचा एक भाग म्हणून एकूण ३४ गिधाडे महाराष्ट्र वन विभागाला हस्तांतरित करण्यात आली.