शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

चांदोली उद्यानात बेकायदा वास्तव्य केल्याने ३३ जणांना सश्रम कारावास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 04:27 IST

शाहूवाडी-शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत अतिक्रमण करून, बेकायदा वास्तव्य करुन पर्यावरणाचा -हास केल्याबद्दल शाहूवाडी न्यायालयाने नऊ कुटुंबातील ३३ जणांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ...

मलकापूर (जि. कोल्हापूर) : शाहूवाडी-शिराळा तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत अतिक्रमण करून, बेकायदा वास्तव्य करुन पर्यावरणाचा -हास केल्याबद्दल शाहूवाडी न्यायालयाने नऊ कुटुंबातील ३३ जणांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. हा खटला २०१३ पासून सुरु होता.विठ्ठल पाटणे, रामू वकटे, भागोजी झोरे, दगडू बोडके, विठू पाटणे, कोंडिबा बोडके, विठू धोंडिबा पाटणे, शामराव पाटणे, नवलू बोडके, (सर्व रा. भेंडवडे वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी नऊ कुटुंबप्रमुखांची नावे आहेत.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाºया निवळे, ढाकळे, तनाळी, सोनार्ली, धनगरवाडा, दुर्गेवाडी आदी गावांचे शासनाने १९९८ मध्ये भेंडवडे, वडगाव या ठिकाणी पुनर्वसन केले होते. त्यावेळी या गावातील नागरिकांना जमिनीचा, घरांचा मोबदला देऊन भेंडवडे व वडगाव येथे जमीन उपलब्ध करून दिली होती. २००२ मध्ये यातील नऊ कुटुंबांनी पुन्हा वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. या नऊ कुटुंबांची सुमारे ७०० ते ८०० जनावरे जंगलात मोकाट फिरत होती. वनविभागाच्याअधिकाºयांनी वारंवार सूचना देऊन अतिक्रमण हटवा, अशा नोटिसा बजाविल्या होत्या. अखेर वनविभागाच्या अधिकाºयांनी या ३३ जणांविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. हा खटला शाहूवाडी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी ए. ए. वाळुंजकर यांच्यासमोर चालला. न्यायालयाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करणे, झाडांची तोड करणे, सरकारी जमिनीत गुरे चारणे, पर्यावरणास बाधा पोहोचविणे, आदी मुद्द्यांवर ही शिक्षा ठोठावली.या निकालाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करणाºयांना चांगली चपराक बसली आहे. त्यामुळे वनजमिनीत अतिक्रमण करण्याचे धाडस कोणी करणार नाही किंवा पर्यावरणाचा ºहास करणार नाही.- एस. एल. झुरे, निवृत्त वन अधिकारी

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा