प्रतिजैविकाची अॅलर्जी : इंजेक्शन देताना सुरू झाला उलटय़ा, चक्कर, थंडीचा त्रस; तपासणीसाठी नुमने पाठवले एफडीएकडे
मुंबई : कुर्ला भाभा रुग्णालयातील 32 महिलांना काल रात्री तापाची औषध आणि इंजेक्शन दिल्यावर चक्कर, उलटय़ा, थंडी वाजणो अशी लक्षणो दिसून आली, या महिलांना प्रतिजैविकाची अॅलर्जी झाल्याचे लक्षात आले. यापैकी 13 महिलांना सायन तर 15 महिलांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून, 4 महिलांवर भाभा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे.
पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. कुर्ला भाभा रुग्णालयातही तापाचे रुग्ण दाखल आहेत. सोमवारी रात्री 9 वाजता या 32 रुग्णांना सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन ही दोन प्रतिजैविक देण्यात आली. सेफोटॅक्ङिाम हे संसर्ग कमी करण्यास आणि सेफ्ट्रीअॅक्झोन हे तापासाठी सर्वसाधारणपणो सगळीकडे वापरले जाते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट औषधाची अॅलर्जी आल्यास त्याला डोस बदलून दिला जातो. मात्र या वेळी तब्बल 32 रुग्णांना याची अॅलर्जी झाल्यामुळे सेफोटॅक्ङिाम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन ही प्रतिजैविके ज्या बॅचमधली होती, त्या बॅचमधल्या प्रतिजैविकांचा वापर तत्काळ थांबवण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रतिजैविके अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
13 रुग्ण सायन रुग्णालयात तर 15 रुग्ण केईएममध्ये
च्सोमवारी रात्री 9.3क्च्या सुमारास या 32 रुग्णांना थोडाफार त्रस जाणवू लागला. औषध घेतल्यावर काहींना थंडी वाजू लागली, तर काहींना उलटय़ा झाल्या.
च्काहींना चक्कर आल्यासारखे वाटू लागले. मात्र या वेळीही सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर होती. या महिलांच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन पुढे गुंतागुंत व्हायला नको, म्हणून 13 रुग्णांना सायन रुग्णालयात तर 15 रुग्णांना केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले.
च्4 रुग्णांवर भाभा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री 13 रुग्णांना सायन तर 15 रुग्णांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. एका रुग्णाचा रक्तदाब कमी आहे, मात्र ती शुद्धीत असल्यामुळे कोणताही धोका नाही, एक - दोन दिवसांमध्ये सर्वाची प्रकृती स्थिर होईल, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.