शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

पनवेल आरटीओमध्ये ३१७ कोटींचा महसूल जमा

By admin | Updated: January 19, 2017 03:24 IST

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरामध्ये तब्बल ३१७ कोटी ७८ लाख रूपयांचा महसूल संकलित केला

मयूर तांबडे,

पनवेल- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरामध्ये तब्बल ३१७ कोटी ७८ लाख रूपयांचा महसूल संकलित केला आहे. जानेवारीपासून ६०,४३४ वाहनांची नोंदणी झाली आहे. शहरवासीयांनी मोटारसायकलला सर्वाधिक पसंती दिली असून ३२,२३० वाहनांची नोंदणी झाली आहे. पनवेल परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. सिडकोसह नैना क्षेत्रामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू असून नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढत आहे. पनवेल शहर व परिसराचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यामुळे व भविष्यात विमानतळ, मेट्रो रेल्वेचे प्रकल्प येत असल्यानेही येथे घर खरेदीला पसंती दिली जात आहे. वाढत्या गृहउद्योगामुळे वाहन उद्योगाचीही चलती असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एक वर्षामध्ये तब्बल ६०,४३४ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३२,२३० मोटारसायकलचा समावेश आहे. सुकापूर, विचुंबे, कळंबोली, खारघर व इतर अनेक ठिकाणी वास्तव्यासाठी गेलेल्या रहिवाशांना नोकरीसाठी मुंबई व इतर ठिकाणी जावे लागत आहे. घरापासून रेल्वे स्टेशन दूर असल्याने तेथे येण्यासाठी मोटारसायकलचा वापर केला जात आहे. यामुळेच आरटीओमध्ये सर्वात जास्त मोटारसायकलची नोंदणी झाली असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. शिवाय शहरामध्ये पार्किंगची समस्या व इतर कारणांनीही मोटारसायकल खरेदीला नागरिकांनी विशेषत: तरूणांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल परिसराच्या विकासाबरोबर येथील रहिवाशांचा आर्थिक स्तरही सुधारू लागला आहे. यामुळेच कार खरेदीचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरामध्ये १४,१७५ कारची खरेदी करण्यात आली असून ही संख्या मोटारसायकलनंतर सर्वात मोठी आहे. त्या प्रमाणात अवजड वाहने व इतर वाहनांची खरेदी अत्यंत कमी झाली आहे. ओला, उबर व इतर कंपन्यांमुळे टुरीस्ट टॅक्सी खरेदीचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. वाहन खरेदीमध्ये १९०१ रिक्षांचीही खरेदी झाली आहे. कार खरेदी करण्याबरोबर तिला आकर्षक नंबर मिळावा यासाठीही वाहनधारकांनी पसंती दिली आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख रूपये व्हीआयपी नंबरच्या माध्यमातून जमा झाले आहेत. १ क्रमांक मिळविण्यासाठी तिप्पट म्हणजेच १३ लाख ५० हजार रूपये भरावे लागत असल्याने वर्षभरामध्ये एकही ग्राहकाने एक नंबर घेतलेला नाही. एप्रिल ते डिसेंबर दरम्यानच्या आकड्यांवर नजर टाकली तर ९ महिन्यामध्ये तब्बल ५०७० ग्राहकांनी व्हीआयपी नंबर घेतला आहे. २ ते २५ नंबरसाठी जास्त मागणी आहे.याशिवाय इतरही महत्वाच्या क्रमांकांना ग्राहकांनी पसंती दिली असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्हीआयपी नंबरमुळे शासनाच्या महसुलामध्ये वाढ झाली असून नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येते.