शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सहकारी बँकांच्या खातेदारांनी केले ठेव विम्याचे १४ हजार कोटींचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 04:39 IST

रिझर्व्ह बँकेने दिली सप्टेंबर अखेरची आकडेवारी

मुंबई : सुमारे ६,५००कोटी रुपयांच्या घोटाळयाने पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच देशभरातील अडचणीत आलेल्या सहकारी बँकांच्या खातेदारांनी ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळा’कडे त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सुमारे १४,१०० कोटी रुपयांचे दावे दाखल केले असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘फिनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट’मध्ये सप्टेंबर २०१९ अखेरची आकडेवारी देताना ही माहिती दिली आहे. मात्र सर्व ठेवीदारांना या दाव्यांची रक्कम येकाच वेळी देण्याची वेळ येणार नाही किंवा बऱ्याच दाव्यांची रक्कम कदाचित द्यावीही लागणार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.ज्या बँकांवर निर्बंध लागू केले आहेत, ज्या बँका अवसायनात काढण्याचेआदेश झाले आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे अशा बँकांच्या ठेवीदारांनी दाखल केलेल्या दाव्यांची एकूण रक्कम १४,०९८ कोटी रुपये आहे. याची फोड देताना अहवालात म्हटले आहे की, यापैकी ३,४१४ कोटी रुपयांचे दावे राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांसंबंधीचे तर १०, ६८४ कोटी रुपयांचे दावे ‘पीएससी’ सह अन्य नागरी बँकांसंबंधीचे आहेत.देशातील अनेक सहकारी बँकांची स्थिती सध्या नाजूक असून त्यांची प्रकरणे रिझर्व्ह बँक निरनिराळ््या स्तरांवर हाताळत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ३० सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमले आहेत. ठेवविमा कायद्यानुसार ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम विमा महामंडळाकडून देण्याची तरतूद आहे.असे असले तरी अशा सर्व बँकांच्या ठेवीदारांना एकाच वेळी विम्याचे पैसे देण्याची वेळ येणार नाही किंवा सध्या आजारी असलेल्या काही बँकांची आर्थिक स्थिती कालांतराने सुधारुही शकेल. त्यामुळे १४ हजार कोटी रुपयांचे दावे दाखल होणे ही असामान्य परिस्थिती नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.‘पीएमसी’ बँकेतील घोटाळा हा अलिकडच्या काळातील सहकारी बँकांमधील उघड झालेला सर्वात मोठा घोटाळा आहे. सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता व ११,८०० कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाला आहे. म्हणजेच बँकेचे ७३ टक्के अधिमूल्य या घोटाळ्याने कमी झाले आहे. दिवाळखोरीत गेलेल्या ‘एचडीआयएल’ या एकाच कंपनीला गेल्या ११ वर्षांत दिलेल्या कर्जांमध्ये हा घोटाळा झाला आहे.