शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

सांगलीत दस-यादिवशी ३० ते ३५ कोटींची उलाढाल, चारचाकी वाहनांसह टीव्ही, मोबाईल खरेदीकडे ग्राहकांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:27 IST

मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दस-यानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता.

सांगली : मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दस-यानिमित्त झळाळी आली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल होता. सोन्याच्या दर स्थिर असले तरी अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. दस-याला दोन ते अडीच हजारांवर दुचाकी, तर साडेपाचशेवर चारचाकी वाहने नव्याने रस्त्यावर आली. सांगलीच्या बाजारपेठेत अंदाजे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.बाजारपेठेला ख-या अर्थाने सावरणा-या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या दसरा सणाला यावर्षी चांगल्या खरेदीचा अंदाज होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीच्या झळ्या सहन करणा-या व्यावसायिकांना दस-याने थोडाफार दिलासा दिला. खरेदीमध्ये सोने- चांदी, दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सध्या सोन्याच्या भाव स्थिर असले तरी म्हणावी तितकी गर्दी सराफ पेठेत दिसत नव्हती. सराफ पेठेत अंदाजे दोन कोटीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही उलाढाल कमीच म्हणावी लागेल.दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्जपुरवठा केल्याने मोटारसायकलींच्या, चारचाकींच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये गिअरच्या आणि गिअरलेस अशा दोन्ही प्रकारांतील जवळपास दोन ते अडीच हजार गाड्यांची विक्री झाली. तसेच अनेक ग्राहकांनी दस-याच्या मुहूर्तावर बुकिंग करून दिवाळीला वाहन ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच शेती मशागतीसाठी लागणारे लहान ट्रॅक्टर्स, इतर अत्याधुनिक अवजारांचीही चांगली विक्री झाली.चारचाकी गाड्यांच्याही समाधानकारक विक्री झाली आहे. मारुती व नेक्सा कंपनीच्या ३८८ गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सीनियर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले. तर कंपन्यांच्या गाड्यांची ब-यापैकी विक्री झाली असून अंदाजे ५५० हून अधिक चारचाकी वाहने दस-यादिवशी रस्त्यावर आली आहेत. वित्तीय कंपन्यांकडून दहा हजारावरील कोणत्याही मोबाईलच्या खरेदीसाठी फायनान्स उपलब्ध करून दिल्याने, ज्या ग्राहकाचा किमान दहा हजाराचा मोबाईल खरेदीचा इरादा होता, त्याने थेट 20 हजारांपर्यंतचा मोबाईल खरेदी केला. दहा हजाराच्या पुढील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांनाही ही सुविधा उपलब्ध होती.