शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जन्मदात्या पित्याकडून ३ मुलींवर बलात्कार

By admin | Updated: April 26, 2015 01:18 IST

जन्मदात्या पित्यानेच आपल्यावर बलात्कार केल्याने ही मुलगी ओक्साबोक्शी रडून सांगत होती.

करणी केल्याने कृत्य करत असल्याचा बापाचा बहाणा : आईला सांगूनही मुलींनाच गप्प बसण्याचा सल्लापुणे : कोंढवा पोलिसांचे बीट मार्शल हद्दीमध्ये गस्त घालीत होते... साधारणपणे पंधरा वर्षांची एक मुलगी रस्त्यावर रडत बसलेली त्यांना दिसली... मार्शलवरील दोन्ही पोलिसांनी तिच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केली... तिला सोबत घेऊन हे दोघेही पोलीस चौकीत गेले. महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली... त्यानंतर तिने जे काही सांगितले, त्यामुळे पोलीस हादरून गेले.... जन्मदात्या पित्यानेच आपल्यावर बलात्कार केल्याने ही मुलगी ओक्साबोक्शी रडून सांगत होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या नराधम पित्याने त्याच्या आणखी दोन मुलींबाबतही असाच प्रकार केला आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलींनी आईला सांगूनही तिने गप्प राहण्याचा सल्ला दिला. नवऱ्यावर कोणीतरी करणी केल्याने तो असे वागत असल्याचे तिला वाटत होते. पिता आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. मूळचं उत्तर प्रदेशातील हे कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात रहायला आलं. कोंढव्यामध्ये चार मुली आणि एका मुलासह हे दाम्पत्य रहात आहे. बाप रिक्षा चालवतो. तर त्याची पत्नी छोटीमोठी कामे करते. पत्नी कामावर गेली, की तो दुपारी जेवणाच्या निमित्ताने घरी यायचा. घरामध्ये एकट्या असलेल्या मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर बलात्कार करायचा. त्याच्या सर्वांत मोठ्या २२ वर्षीय मुलीने शुक्रवारी पोलिसांना जबाब दिला. त्यामध्ये आपल्यावरही वडिलांनी चार वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिचे लग्न लावून दिले. उत्तर प्रदेशला सासरी नांदत असताना पतीने तिला परत पाठवून दिले. तेव्हापासून ती माहेरी राहते. परंतु ती वडिलांशी बोलत नाही. वडील पुन्हा बलात्कार करतील, या भीतीने ती कायम आईसोबतच राहते. आईसोबतच कामावर जाते. तर धाकट्या १८ वर्षांच्या मुलीवरही त्याने अशाच पद्धतीने बलात्कार केला होता. परंतु तिने जेव्हा आईला हा प्रकार सांगितला तेव्हा आईने सर्वांना शांत राहण्यास सांगितल्याचे जबाबात म्हटले आहे. वडिलांवर कुणीतरी करणी केली आहे, त्यामुळे ते असे वागतात, असे ती मुलींना सांगत होती.गेल्या आठवड्यात त्याची नजर तिसऱ्या मुलीकडे वळली. दुपारी जेवायला आला असता त्याने तिच्यावरही बलात्कार केला. घरासमोर रडत बसलेल्या या मुलीला पोलीस चौकीत आणल्यावर सर्व बाबींचा खुलासा झाला. पोलिसांनी तिच्या आईलाही बोलावून घेतले. परंतु तिने फिर्याद देण्यास नकार दिला. तसेच मुलीलाही फिर्याद देऊ नको असे सांगितले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीच स्वत:हून फिर्याद दाखल केली आणि त्याला अटक केली. (प्रतिनिधी)पोलीस, डॉक्टरांचे नैतिक पाठबळ हवेप्रत्येक वेळेस मुली लपवतात, असे नाही, काही धाडसाने त्याची तक्रार करण्यास पोलिसांपर्यंत जातात, पण त्याबाबत त्यांना घरी कळू द्यायचे नसते. अशा वेळी पोलिसच त्यांना उलट शिकवतात, की कशाला या भानगडीत पडते, बदनामी होईल, नाही त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, वैद्यकिय तपासणीला वेळ जाईल, वगैरे सांगून त्यांच्या नैतिक तयारीचे खच्चीकरण केले जाते. पोलिसांनी सहकार्य करायला हवे. तसेच डॉक्टरांनीही कुटुंबात सांगितलेले नसल्याने तातडीने तपासणी करून मुलींच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन पाठबळ द्यायला हवे. विकृतीच्या कहाण्या अन् हतबल मातापुणे : एखाद्या चिमुरडीवर कुटुंबातीलच किंवा नातेवाईकाकडून बलात्कार किंवा लंैगिक अत्याचार होत असल्यास बहुतेकवेळा मध्यमवर्गीय हे आपली इज्जत, लाज, नावासाठी पुढेच येत नाहीत. बापाकडूनच अत्याचार होत असले, तरी आयांचा संसार वाचविण्याकडे जास्त कल आढळतो. आपल्या पतीशी आपलं सर्व अर्थाने जुळत आहे ना, तर मग कशाला तक्रारीच्या भानगडीत पडायचे, अशी महिलांची मानसिकता असते. त्यांना पतीच्या वागण्यात सुधार हवा असतो, पण मग तो कोणी तिसऱ्याने करावा, समुपदेशकांनी मदत करावी, अशी अपेक्षा असते. पण त्याच पुढे येत नसल्या, तर इतर समुपदेशक कसे पुढे येतील. काही वेळा, तर अशा प्रसंगांना कसे हाताळायचे यासाठी आई व मुलीच समुपदेशनाला येतात. मध्यमवर्ग पुढे येण्यास धजावतच नाही. याऊलट निम्न स्तर व उच्च मध्यमवर्गीय स्तरातील कुटुंबिय पुढे येताना दिसतात. घटना क्रमांक १ - एक उच्चशिक्षित नोकरदार मुलीविषयी कामभावना वाटत असल्याचे खुलेपणाने पत्नीला सांगतोय. पत्नी तरीही ढिम्मच. एकतर पतीचे समाजातील स्थान आणि नाव, अन् आपला संसार तर सुरळित सुरू आहे ना! मुलगी मात्र आईला सांगतेय, वडील कसे विचित्र वागत आहेत, तरीही आई म्हणून ती ढिम्मच. कारण पुन्हा तेच, यश, नाव, पैसा. तक्रार न करता पतीला कोणी तिऱ्हाईताने समजवावे, अन् यातून सुटका व्हावी, अशी तिची अपेक्षा!घटना क्रमांक २ - पाळणाघर चालविणाऱ्या एका महिलेच्या मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केला. बाईंनी सुरूवातीला तक्रार केली आणि नंतर लगेच मागे घेतली. पतीचे समुपदेशन करता येईल, पण संसार मोडून काय मिळणार, असा यांचा विचार..!हा जागतिक प्रश्न...नैरोबीमध्ये १९८५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षानिमित्त परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ’ब्रेकिंग द सायलेंस’ हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्या लघुपटाचा विषय याच घटनांशी निगडित होता. आई आणि मुलगी एका डायनिंग टेबलवर बसल्या आहेत आणि मुलगी बापाने तिच्यावर केलेला अत्याचार कथन करीत आहे...दोघी रडत आहेत. त्यानंतर झालेल्या चर्चेप्रंसगी एक मुलगी समोर आली. हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात कोंडलेली गोष्ट बोलाविशी वाटली. ‘मी एकटी नाही’....ही तिची प्रतिक्रिया खूपच सुन्न करणारी होती. उत्तर अमेरिकेतील एक मुलगी म्हणाली, माझं मोठ घर आहे..मोठी बाग आहे, माझे आजोबा मला बागेत फिरायला नेत होते, आणि माझ्याबरोबर वाईट गोष्टी करीत होते. माझे आजोबा आदरणीय गृहस्थ...त्यांच्या बाबतीत कसं बोलायचं, असं वाटायचं. हे पाहिल्यानंतर हा एक जागतिक प्रश्न असल्याचे जाणवले. - विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याझोपडपट्टीतील बाई एकूणच सर्व अत्याचाराच्या रागातून, किंवा शिक्षा देण्याच्या भावनेतून तक्रार तरी करते. उच्च वर्ग ही काही प्रमाणात कायद्याच्या ज्ञानामुळे पुढे येतो. पण, तक्रारी आलेल्या न्यायालयात तग धरतीलच याचीही शाश्वती नसते. फिर्यादीला धमकावणे, गैरहजर राहील, असा प्रयत्न करून सुटका करून घेतली जाते. - अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, भगिनी हेल्पलाईनप्रत्येक मूल आणि त्याच्याबाबत घडलेली घटना ही वेगळ्या प्रकारची असल्याने विविध मार्ग वापरून त्यांच्या मनातले जाणून घ्यावे लागते. काही मुले सरळ कोणी कुठे नेऊन काय केले याबद्दल स्पष्टपणे बोलतात. परंतु जी मुले खूपच घाबरलेली असतात त्याना बाहुली हातात देऊन किंवा एखाद्या चित्राच्या माध्यमातून बोलते करावे लागते. कित्येकदा मुलांनी काढलेल्या भीषण चित्रामधूनही घडलेली घटना समजून येते.- अनुराधा सहस्रबुद्धे, संचालिका, चाईल्ड हेल्पलाईन