शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २९३ अनधिकृत गृहप्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 06:01 IST

मुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे. याची गंभीर दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे. याची गंभीर दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या गृहप्रकल्पांनी आपल्या प्रकल्पांची नोंदणी महारेराकडे न करता परस्पर आपल्या गृहप्रकल्पांचे काम बिनधास्तपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळेच महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे.१ मे २०१७ पासून महारेरा कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानंतर ३० एप्रिल २०१८ पर्यंत महारेराकडे ९०३८ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी ७३२८ तक्रारी या वैध होत्या तर १७१० तक्रारी या अवैध होत्या. या १७१० तक्रारींपैकी ७०६ गृहप्रकल्पांविरोधात वारंवार तक्रारी महारेराकडे वर्षभरात येत होत्या. या सर्व सुनावणी झालेल्या तक्रारींचा महारेराकडून अभ्यास करण्यात आला.महारेराकडून करण्यात आलेल्या या अभ्यासाअंतर्गत २९३ गृहप्रकल्प हे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती महारेरासमोर आली आहे.या गृहप्रकल्पात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील गृहप्रकल्पांची संख्या जास्त असून बाकी गृहप्रकल्प राज्यातील इतर ठिकाणचे आहेत. महारेराकडून याच गृहप्रकल्पांविरोधात आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.त्याप्रमाणे या अनधिकृत प्रकल्पांच्या भागातील नगरविकास अधिकारी, महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना या अनधिकृत गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठविल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत गृहप्रकल्पांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश महारेराने संबंधित विभागांना दिले आहेत.

 

 

टॅग्स :Homeघरnewsबातम्या