शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

राज्यात २९३ शाळा चक्क विद्यार्थ्यांविना; १ ते १० पटाच्या शाळांची संख्या ७ हजारांवर

By सीमा महांगडे | Updated: June 18, 2023 07:00 IST

राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे.

मुंबई : एकीकडे राज्यभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे मात्र शाळांच्या विद्यार्थीसंख्येचे भयाण चित्र समोर आले आहे. राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे. यु-डायस प्लस अहवालातून शिक्षणाचे हे झणझणीत वास्तव समोर आले आहे. 

शिक्षण आयुक्तांना सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने ० ते १० पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जून अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थी दुसऱ्या शाळेत नोंदविला आहे वा कसे, विद्यार्थ्यास शासकीय योजनेच्या लाभ देण्यात येत आहे वा नाही ही माहिती सादर द्यायची आहे. 

यु-डायस  काय आहे?यु-डायस ही प्रणाली केंद्र सरकारतर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठवली जाते.

अचूक माहिती भरणे आवश्यक का? राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यु-डायस प्लस माहितीच्या आधारे भारत सरकारकडून विविध योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स), एसइक्यूआय निर्देशांक काढण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

टॅग्स :Studentविद्यार्थी