शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमधून २८ लॅपटॉपची चोरी

By admin | Updated: January 28, 2017 04:18 IST

मुंबईतून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून तब्बल २८ लॅपटॉप चोरणाऱ्या तीन आरोपींना लोहमार्ग पोलिसांकडून अटक

मुंबई : मुंबईतून बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून तब्बल २८ लॅपटॉप चोरणाऱ्या तीन आरोपींना लोहमार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यात २८ पैकी ३० लाख रुपये किमतीचे २७ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली. नकुश ओझोप हे १७ सप्टेंबर २0१६ रोजी कोणार्क एक्स्प्रेसने पुणे ते मुंबई असा प्रवास करीत होते. तेव्हा त्यांची रोख रक्कम १,८00 रुपये, लेनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स चोरीला गेले. त्याबाबत सीएसटी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात फिरोजाबाद येथे राहणारा आरोपी जगदीश सोनी याचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी फिरोजाबाद येथे जाऊन सोनी याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कमल यादव आणि दिनेश निर्मल असे दोन साथीदारही असल्याची कबुली दिली. त्यानंतर यातील आरोपी कमल यादव याने सप्टेंबर २0१६ मध्ये बंगळुरूला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या पार्सल वॅगनचा डबा फोडून त्यामधून अ‍ॅपल कंपनीच्या २८ लॅपटॉपची चोरी केली आणि ते लॅपटॉप फिरोजबाद येथे ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत बंगळुरू पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर पारसमल मोदी यांनी लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फिरोजाबाद येथे जाऊन पारसमल मोदी यांच्या मालकीचे ३0 लाख ६७ हजार ५४९ रुपये किमतीचे २७ लॅपटॉप आणि नकुश जोजेब यांच्या मालकीचा ३१ हजार ९00 रुपये किमतीचा लेनोव्हाचा लॅपटॉप हस्तगत केला व त्याचबरोबर एक मोटारोला कंपनीची वॉकीटॉकी चार्जरसह जप्त करण्यात आली. यासंदर्भात पोलीस उपआयुक्त (मध्य परिमंडळ) समाधान पवार यांनी सांगितले की, धावत्या ट्रेनमध्ये ही चोरी करण्यात आली होती. यात डब्यातील एका भागाचे स्क्रू काढण्यात आले आणि ही चोरी करण्यात आली. चोरीच्या वेळी वापरण्यात आलेली साधनेही हस्तगत करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)उद्यान एक्स्प्रेसमध्ये केली चोरीउद्यान एक्स्प्रेसने मुंबई सोडल्यानंतर सोलापूरच्या जवळपास ही चोरी केली. दोन तासांत चोरी केल्यानंतर एका ठिकाणी उतरून त्यांनी पलायन केले. गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलीस उपआयुक्त समाधान पवार, साहाय्यक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महानोर व त्यांच्या पथकाने केला.