शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वन्यप्राण्यांकडून २८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 26, 2015 00:10 IST

पाच जिल्ह्यांतील आकडेवारी : सन २००४ पासून कोल्हापूर विभागात ८० जण जखमी

गेल्या दहा वर्षांपासून हत्ती, बिबट्या, गवे अशा वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढतो आहे. रविवारी (दि. २२) राधानगरी तालुक्यात हत्तीने एका शेतकऱ्याला सोंडेत पकडून आपटले. त्यामध्ये तो जखमी शेतकरी मृत्यूूशी झुंज देत आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य असा टोकाचा संघर्ष ऐरणीवर आला आहे. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीजणांना जीव गमवावा लागला, वन विभागाकडून कितीजणांवर गुन्हे दाखल केले, नुकसानभरपाई किती नाममात्र आहे, या अंगाने वेध घेणारी मालिका आजपासून... भीमगोंडा देसाई-कोल्हापूरकोल्हापूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २००४ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २८ जणांना जीव गमवावा लागला. एकूण ८० जण जखमी झाले. मृतांपैकी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ जणांना हत्तीने चिरडले आहे. उर्वरितांचा मृत्यू गवा, बिबट्या यांच्या हल्ल्यांत झाला आहे. अजूनही त्यांचा उपद्रव सुरूच आहे. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. स्वार्थासाठी जंगलांवर अतिक्रमण वाढते आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहेत. पर्यटनासाठी जंगलात घुसखोरी होत आहे. जंगले विरळ होत आहेत. या महत्त्वाच्या कारणांमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थानेच उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी हत्तींसह वन्य प्राण्यांनी मानवी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे.विभागातील या पाच जिल्ह्यांत सन २००४ पासून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे अधिक वाढला. पूर्वी सर्कशीमध्ये पाहावे लागणारे हत्ती गावामध्ये घुसू लागले. शेतकऱ्यांना त्यांचे सहज दर्शन होऊ लागले. जंगलाशेजारील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही क्षणी हत्ती, बिबट्या, गव्याचा हल्ला होऊ शकत असल्यामुळे त्यांचे जगणेच भयकंपित झाले आहे.हल्ल्याच्या भीतीने जंगलालगत असलेल्या शेकडो एकर जमिनी कसणे शेतकऱ्यांनी बंद करून त्या पडिकच ठेवणे पसंत केले आहे. वन्य प्राण्यांना पूर्णपणे रोखण्यात वन विभागाला यश आलेले नाही. हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहांपैकी आठजणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. एका मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याने भरपाई दिलेली नाही. आॅगस्ट २००६ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये तस्कराच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनमजुराच्या वारसांना वन्यजीव विभागाकडून दोन लाख देण्यात आले आहेत. जखमी २३ जणांना ६ लाख ७० हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे. (क्रमश:) दोन जिल्ह्यांतील स्थितीसन २००४ पासून २०१४ अखेर हत्तींच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांतील पाचजणांचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागांतील आठजणांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० पासून आतापर्यंत बिबट्या, गवा अशा वन्यप्राण्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ११, सातारा जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.वन्य प्राणी मानव संघर्ष भाग १