शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 05:37 IST

एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत राज्यात २३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, तर १७ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर सोन्यासह ४३ किलोचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. असा एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. २० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

१० उमेदवारांनी दाखल केले अर्जविदर्भातील पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.  यापैकी रामटेकमध्ये एक, नागपूरमध्ये पाच, भंडारा-गोंदियामध्ये दोन, गडचिरोली-चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. राज्यात जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी २३ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे, ३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त केली आहे. ४३ किलो सोने-चांदी व इतर मौल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत परवाना नसलेली ३०८ शस्त्रे जप्त करण्यात आली.

पक्षाच्या जाहिरातींना लागणार निवडणूक आयोगाची मान्यतावर्तमानपत्रात एखाद्या राजकीय पक्षाला जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास निवडणूक आयोगाकडून संबधित जाहिरात प्रमाणित करून घ्यावी लागेल. आतापर्यंत अशा दोन जाहिराती निवडणूक कार्यालयात सादर झाल्या. त्यांचे प्रमाणीकरण सुरू असल्याचे चोकलिंगम म्हणाले.

अवैध दारू पकडण्यासाठी एरवी १२ चेकपोस्ट असतात.आता त्यांची संख्या निवडणूक काळ लक्षात घेऊन ४० करण्यात आली आहे. याशिवाय हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय जेथे मोठ्या प्रमाणात चालतो अशी ठिकाणे आणि परराज्यातून दारू येते अशा ठिकाणी जलद कृतीदल तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी तात्काळ कारवाई केली जात आहे.- विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Electionनिवडणूक