मंगरूळपीर: मंगरूळपीर तालुक्यात २00७ ते आतापर्यंत १८ हजार ९४३ महिला व पुरूषांनी तपासणी करून घेतली. यामध्ये २३३ पुरूष तर ३३ गरोदर माता एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहे. मागील सात वर्षाच्या तुलनेत संसर्गित रूग्णांचा आकडा मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. २00७ साली ५४४ पुरूष तपासणीत २८ लोक एचआयव्ही बाधित आढळले होते तर ४८५ गदोदरमाताच्या चाचणीत केवळ ४ महिला संसर्गित दिसून आल्या. या आकडेवारीत सद्याच्या परिस्थितीत प्रचंड तफावत झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. तालुक्यात २00७ पासून एचआयव्हीबाबत तपासणीची आकडेवारी हाती आली आहे. साडे सात वर्षात २६६ रूग्ण एचआयव्ही बाधीत आढळून आले. २00८ मध्ये ८२४ लोकांच्या तपासणीतून ३३ बाधित आढळले तर ९८५ गरोदर मातातून फक्त दोन महिला संसर्गित दिसून आल्या.२00९ मध्ये १ हजार १४९ लोकात ३४ व ५२३ गरोदर मातांच्या चाचणीत ७ माता बाधित दिसून आल्या. २0१0 मध्ये १ हजार ४२१ पुरूषात ४९ व १ हजार ६६७ गरोदरमातामध्ये ५ बाधीत, २0११ मध्ये १ हजार ६७ पुरूषात ३१ व १ हजार ८६७ महिलात केवळ ४ गरोदर माता एचआयव्ही संसर्गित दिसल्या. २0१२ मध्ये १ हजार २१0 पुरूषांच्या चाचणीत १७ बाधित तर १ हजार ५३३ गरोदरमातामध्ये फक्त २ बाधित आढळून आल्या. २0१३ मध्ये १ हजार ५१९ पुरूषांमध्ये २२ व २ हजार ३0२ गरोदर मातात ७ माता संसर्गित आढळल्या आणि चालू वर्षात ९७५ पुरूषांच्या चाचणीत १९ तर ८७२ गरोदर माता चाचणीमध्ये २ माता एचआयव्ही बाधीत दिसून आल्या. या साडे सात वर्षाच्या काळात ८ हजार ७0९ पुरूषांच्या तपासणीत २३३ व १0 हजार २३४ गरोदरमाता चाचणीत ३३ मातांना एडस्ची लागण झाल्याचे दिसून आले. एचआयव्ही बाधीत मध्ये पुरूष आघाडीवर असल्याचे प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
२६६ एचआयव्ही संसर्गित रूग्ण
By admin | Updated: July 10, 2014 22:37 IST