शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 16:34 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या १७ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावं, यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री १२ वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. लक्ष्मण हाके यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील. नुसत्या मराठवाड्यात २५ आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार आहेत. आमच्याकडे त्या २५ आमदारांची यादीही तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

या विधानसभेला शरद पवार, एकनाथ शिंदे, काँग्रेस यांना ओबीसी मोठा दणका देणार आहेत. जे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटलेत, त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना निवडणुकीत ओबीसी धूळ चालणार आहे, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली वाटेल ते मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणारी नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. 

काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, आमच्या मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी उपोषण करत आहे. मराठा समाजाचे मुलं मोठी झाली पाहिजे. यासाठी मी १७ तारखेपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. कोणीही आपले काम सोडून आंतरवालीकडे येऊ नये, मी १६ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaxman hakeलक्ष्मण हाकेMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण