शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलर प्लॅन्टमधून २५ किलोवॅट वीजनिर्मिती

By admin | Updated: May 29, 2017 06:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील युवा पिढीकडून मोठ्या अपेक्षा असून त्याबाबत ते आशावादी असल्याचे सातत्याने सांगत आहेत

जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील युवा पिढीकडून मोठ्या अपेक्षा असून त्याबाबत ते आशावादी असल्याचे सातत्याने सांगत आहेत. युथ पॉवरमधून उद्याचा ‘पॉवर इंडिया’ साकारण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आणि त्यांच्या या स्वप्नपूर्तीची नांदी, ऐतिहासिक महाड नगरीत स्वत:चा तब्बल २५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट उभारून, त्यावर स्वत:चे दोन प्लॅन्ट यशस्वीरीत्या चालवून कोकणातील पहिला ‘पॉवर युथ’ उद्योजक असा नावलौकिक स्वकर्तृत्वाने महाडचा तरुण उद्योजक जितेश तलाठी यांनी मिळवला आहे.जितेश तलाठी यांनी आॅटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदवी संपादन केली आहे. नोकरीकरिता मुंबई-पुण्यात जायचे नाही अशी पक्की खुणगाठ बांधून महाडमध्येच काहीतरी करून दाखवायचे असे त्यांनी ठरवले. शीतपेये निर्मितीचा कारखाना आणि बर्फाचा कारखाना या दोन घरातील पारंपरिक व्यवसायांचा विचार करून, त्यामध्येच आपण उतरायचा निर्णय त्यांनी घेतला. कुटुंबाच्या पारंपरिक कारखान्याचे रूपांतर मॉडर्न प्लॅन्टमध्ये करण्याचे निश्चित करून, सर्वप्रथम मानव संचालित शीतपेये निर्मितीचा कारखाना पूर्णपणे स्वयंचलित (आॅटोमॅटिक) करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यात यश मिळविले. सद्यस्थितीत त्यांच्या या शीतपेयाच्या आॅटोमॅटिक बॉटलिंग प्लॅन्टमध्ये दर तासाला एक हजार बाटल्यांचे बॉटलिंग होते. बॉटलिंग प्लॅन्ट पूर्णपणे आॅटोमॅटिक असल्याने शीतपेयांंची शुद्धता उच्चप्रतीची राखण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. अशाच प्रकारे आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा सातत्याने कौशल्यपूर्वक वापर करून त्यांनी आपल्या बर्फाच्या कारखान्यातही अनेक प्रयोगकरून तो अत्याधुनिक केला आहे.दोन्ही कारखाने चालविण्याकरिता विनाखंड विजेची नितांत गरज असते. अनेकदा वीज खंडित होण्याच्या समस्येस त्यांना सामोरे जावे लागत होते. पेट्रोल वा डिझेलवर चालणाऱ्या जनरेटर्समधून उपलब्ध होणारी वीज आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने, त्यांनी अखेर सौर उर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ‘पंतप्रधान रोजगार योजने’चा त्यांनी अभ्यास करून, रायगड जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधला. ‘पंतप्रधान रोजगार योजने’मधून उपलब्ध वित्तीय साहाय्यातून आपल्या प्लॅन्टच्या इमारतीच्या टेरेसवरच सोलर पॅनल्स बसवून, २५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट तयार केला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने देखील जितेश यांच्या या सोलर पॉवर प्लॅन्टला मान्यता देवून, त्या प्लॅन्टमधून तयार होणाऱ्या विजेपैकी अतिरिक्त वीज प्रति युनिट चार रुपये दराने विकत घेण्याकरिता करार देखील केला. जितेश आपली विजेची गरज भागवून अनेकदा अतिरिक्त वीज वीज वितरण कंपनीच्या ‘पॉवर ग्रीड’ला देत आहेत.२५ किलोवॅट विजेची बचत१स्वत:च्या सोलर पॉवर प्लॅन्टमधून २५ किलोवॅट वीजनिर्मिती करून, स्वत:च्या प्लॅन्टकरिता ती जितेश वापरत असल्याने, त्यांना दररोज २५ किलोवॅट वीज आता वीज वितरण कंपनीकडून घ्यावी लागत नाही. परिणामी त्यांनी सरकारी वीज वितरण कंपनीवरील वीज पुरवठ्याचा भार कमी करुन, राज्यात दररोज २५ किलोवॅट विजेची बचत करुन दाखविली आहे, हा अन्य उद्योजकांकरीता एक चांगला वस्तुपाठ ठरला आहे. २येत्या काही महिन्यात ४५ किलोवॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सोलर पॉवर प्लॅन्ट आपण कार्यान्वित करीत असून, त्या विजेवर माझा १० टन बर्फ निर्मितीचा प्लँट चालणार आहे. हा दुसरा सोलर पॉवर प्लॅन्ट कार्यान्वित झाल्यावर एकूण वीजनिर्मिती ७० किलोवॅट होईल. परिणामी राज्याच्या वीज वापरात मी ७० किलोवॅट विजेची बचत करू शकेन असा विश्वास जितेश तलाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.