शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:56 IST

सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे. 

राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये आज लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच लोकांनी रांगा लावल्या असून अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडण्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम होणार आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे. 

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भाग्य सीलबंद होणार आहे. पावसाचा अंदाज घेत मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर २५ ईव्हीएम बिघडली होती. तर परळीमध्ये ईव्हीएम मशीनच सुरु होत नव्हते. या सर्व ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावण्यात आली व त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. तोवर मतदार राजा रांगेतच खोळंबला होता. यामुळे मतदानाच्या पहिल्या टक्केवारीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. चौथा टप्पा संपताच देशातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३८० म्हणजेच ७० टक्के मतदारसंघातील रणधुमाळी संपणार आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ १६३ मतदारसंघ शिल्लक राहतील.

मतदारसंघ उमेदवारनंदुरबार     ११जळगाव     १४रावेर     २४जालना     २६औरंगाबाद ३७मावळ     ३३पुणे     ३५शिरुर     ३२अहमदनगर २५शिर्डी     २०बीड     ४१

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनaurangabad-pcऔरंगाबादbeed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४