शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच पोलिसांनी संपविले २५ टक्के नक्षलवादी; ४९ जणांचा खात्मा, आता उरले जेमतेम दीडशेच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 06:31 IST

Naxalites : वर्षभरापूर्वी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एकूण नक्षलवाद्यांपैकी २५ टक्के नक्षलवादी यावर्षीच्या चकमकींमध्ये संपल्याचे दिसून येते. पोलिसांच्या आक्रमकतेपुढे हतबल होत असलेल्या नक्षलींच्या या चळवळीला यामुळे उतरती कळा लागली आहे. 

- मनोज ताजने

गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याला नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख देणाऱ्या नक्षल चळवळीला सरत्या वर्षाने मोठा हादरा दिला आहे. या वर्षभरात पोलिसांशी झालेल्या चकमकींमध्ये ४९ नक्षलवाद्यांना प्राणाला मुकावे लागले. वर्षभरापूर्वी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एकूण नक्षलवाद्यांपैकी २५ टक्के नक्षलवादी यावर्षीच्या चकमकींमध्ये संपल्याचे दिसून येते. पोलिसांच्या आक्रमकतेपुढे हतबल होत असलेल्या नक्षलींच्या या चळवळीला यामुळे उतरती कळा लागली आहे. 

जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये १५ चकमकी झाल्या. त्यापैकी १० चकमकींमध्ये नक्षल्यांच्या जीविताचे नुकसान झाले नाही. मात्र पाच चकमकींमध्ये त्यांना मोठे नुकसान झाले. १३ नोव्हेंबरला झालेली मर्दिनटोला जंगलातील चकमक ऐतिहासिक ठरली. या चकमकीत पोलिसांच्या सी-६० कमांडोंनी तब्बल २७ नक्षलवाद्यांचा वेध घेतला. २०१८ नंतरची ही सर्वांत मोठी चकमक ठरली. 

याच वर्षात २१ मे रोजी पैदीच्या जंगलात उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात १ डीव्हीसीएम, ३ एसीएम आणि १ पीपीसीएम यांचा समावेश होता. जिल्ह्यात आता जेमतेम दीडशेच्या घरात नक्षली शिल्लक राहिले आहेत. 

२० अटकेतवर्षभरात पोलिसांनी २० नक्षलवाद्यांना अटक केली. त्यात काही महिला सदस्यांचाही समावेश आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार शस्त्र खाली ठेवून चळवळीतून बाहेर येण्याचे आवाहन पोलिसांनी वारंवार केल्यानंतरही काही नक्षलवादी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे त्यांना  पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले. त्यांच्यावर आता न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.

मिलिंद तेलतुंबडेची दहशत संपलीतीन दशकांपासून नक्षल चळवळीत सक्रिय राहून आपली दहशत निर्माण करणारा मिलिंद तेलतुंबडे हा नक्षल नेता १३ नोव्हेंबरच्या चकमकीत ठार झाला. नक्षलींविरोधी अभियानातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या तेलतुंबडेवर महाराष्ट्र शासनाने ५० लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्याच्या मृत्यूमुळे नक्षली दहशतही बऱ्याच प्रमाणात कमी झाली.

प्रमुख पाच चकमकीदि.    ठिकाण    मृत नक्षली२९ मार्च    खोब्रामेंढा जंगल     ५ २८ एप्रिल     गोरगट्टा जंगल       २ १३ मे    मोरचुल जंगल       २ २१ मे    पैदी जंगल     १३ १३ नोव्हें.     मर्दिनटोला जंगल    २७ 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली