शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ; उन्हाळ्यामुळे मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 07:18 IST

मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण वीजवापर २६.४ अब्ज युनिट होता. यावरून औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशातील  जवळपास सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही देशातील विजेची मागणी गेल्या महिन्यात वाढली आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकूण वीजवापर २६.४ अब्ज युनिट होता. यावरून औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वीज मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात २१.०५ अब्ज युनिट एवढा वापर होता. त्यात यावर्षी तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षी संपूर्ण मे महिन्यात १०२.०८ अब्ज युनिट एवढा वीजवापर होता. यावर्षी ६ मे रोजी १ लाख ६८ हजार ७८० मेगावॅट एवढी सर्वाधिक मागणी नोंदव‍िण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिलमध्येही विजेची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढून १ लाख १९ हजार २७० मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली होती. तर गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये विजेची मागणी ८४ हजार ५५० मेगावॅटपर्यंत घटली होती.

कशामुळे वाढ... यावर्षी वीजवापर वाढण्यासोबतच तुलनात्मक आधारामध्ये तफावत आल्यामुळे आकडेवारीमध्ये मोठा फरक दिसत आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये मे महिन्यात लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लावण्यात आले. तरीही वीजवापरात वाढ झाली आहे. औद्योगिकसह उन्हाळ्यामुळे घरगुती वीजवापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, बहुतांश निर्बंध हे एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात लावण्यात आले. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण