लातूर : येथील आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या २६ आरोपींपैकी २५ आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत अद्यापही फरार आहेत.चार हजार विद्यार्थ्यांसमोर काळे फासत मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भाईकट्टी हल्ला प्रकरणातील २५ आरोपी मोकाट
By admin | Updated: November 3, 2015 02:43 IST