शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात २३ हजार कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 12:27 IST

सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामात झाल्याचा आरोप आमदार उदय सामंत यांचे बंधू व प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार किरण सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामात झाल्याचा आरोप आमदार उदय सामंत यांचे बंधू व प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार किरण सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.हा महाराष्ट्र संपवण्याचा डाव असून, मी तांत्रिक मुद्द्यावर कोणत्याही अभियंत्याशी बोलण्यास तयार असल्याचे सांगत सामंत यांनी या भ्रष्टाचारप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला आव्हान दिले. ते पुढे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात मुंबईत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत काही आमदारांनी संबंधित विषय मांडला होता. मात्र, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी या दराने का प्रक्रिया राबवली, हे त्यांनाच माहिती असे सामंत म्हणाले.ते पुढे म्हणाले की, ही निविदा प्रक्रिया सचिव जोशी यांच्या सूचनेप्रमाणे राबवली जात आहे. प्रति किलोमीटर रस्त्याचे १ कोटी रुपये दराने अंदाजपत्रक बनविणे शक्य असताना ते प्रति किलोमीटर अडीच कोटी रुपये दराने बनविण्यात आले आहे, असे किरण सामंत म्हणाले. राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम १० हजार कोटी रुपंयामध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, याच कामासाठी सावजनिक बांधकाम खाते सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्च करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील ११९ कि़लोमीटर लांबीच्या रस्त्यांचाही या कामामध्ये समावेश असल्याचे किरण सामंत यांनी यावेळी सांगितले.नार्को टेस्ट करा..सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यावर थेट आरोप करताना त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही ठेकेदार किरण सामंत यांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी