शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

डोंगरगावात पावसाचा कहर २३ जण अडकले, मदतीसाठी येणार NDRF टीम

By admin | Updated: October 1, 2016 21:09 IST

लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत डोंगरगाव येथील २३ गावकरी पहाटे सात वाजेपासून झाडावर अडकून पडले आहेत.

ऑनलाइन लोकमत लोहा/माळाकोळी, दि. १ -  लिंबोटी धरणाच्या अचानक आलेल्या पाण्यामुळे लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे शिवारात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे २३ जणाच्या सुटकेसाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.या नागरिकांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या पश्चिम कंमाडकडून गुजरात येथील गांधीनगर येथूनही हेलिकॅाप्टर बोलाविण्यात आले आहे. पूरस्थितीबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. डोंगरगाव येथे मदतीसाठी लोहा, कंधार तहसीलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, नांदेड महापालिकेचे आपत्ती निवारण पथक तातडीने डोंगरगाव येथे पोहचली आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरआफ) चे पथकही रात्री याठिकाणी पोहचणार आहे. डोंगरगाव येथे सुटकेसाठी बोलाविण्यात आलेले हवाई दलाचे हेलीकॅाप्टर सायंकाळच्या अंधारामुळे आणि खराब हवामानामुळे परत गेले आहे. त्यामुळे तातडीने अन्य ठिकाणाहून म्हणजेच गुजरात गांधीनगर येथून हवाईदलाच्या रात्रीही मदत आणि सुटकेसाठी काम करू शकणाऱ्या हेलिकॅाप्टर बोलाविण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तातडीने पोहचावे यासाठी समन्वय व संपर्क साधण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा डोंगरगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. पाण्यातअडकलेल्यांनाही धीर देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.जिल्हास्तरावरूनही विविध प्रकारची मदत आणि सुटकेसाठीचे साहित्य तसेच साधनसामुग्री वेळेत पोहचेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यासाठी प्रत्यक्ष संपर्कसाधून समन्वय करीत आहेत. याबाबत वरीष्ठ आणि आपत्ती व्यवस्थानासाठी मदत करू शकणाऱ्या राज्यस्तरीय यंत्रणाच्या वरीष्ठांशी वेळोवळी माहितीची देवाण-घेवाणकेली जात आहे. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच विविधस्तरावरीलअधिकारीआपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध प्रयत्न करत आहेत.
लोहा तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे,कंधारच्या तहसिलदार अरूणा संगेवार व अधिकारी यांच्यासह त्यांचया सहकाऱ्यांची टीम डोंगरगाव येथे प्रत्यक्ष थांबून नागरिकांना धीर देत आहेत. जिल्हा पुरवठाअधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह अन्य एका पथकही डोंगरगावकडे रवाना करण्यात येत आहे.