शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘२३ निवडणुका केल्या, पण इतके हाल नव्हते’, गैरव्यवस्थापनामुळे कर्मचारी वेठीला

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 22, 2024 10:39 IST

मतदान केंद्रांवर पंखे नाही, पिण्यास पाणी नाही, नाष्टा, जेवण नाही इत्यादी अनंत अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांनी केला.

मुंबई : आतापर्यंत २३ निवडणुकांचे काम केले. परंतु, या निवडणुकीत आलेला भयावह अनुभव आतापर्यंत कधीच आला नाही. एका शिक्षकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया सोमवारी मुंबईत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सुमारे ५७ हजार कर्मचाऱ्यांना झालेल्या मनस्तापाची व्यथा मांडण्यासाठी पुरेशी आहे.

मतदान केंद्रांवर पंखे नाही, पिण्यास पाणी नाही, नाष्टा, जेवण नाही इत्यादी अनंत अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांनी केला. परंतु, मतदानानंतर मशीन जमा करणे, विविध प्रकारचे फॉर्म भरणे, अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या कामातही कमालीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना घर गाठेपर्यंत पहाटेचे सहा-सात वाजले. इतका गोंधळ आजवर कुठल्याच निवडणुकीत अनुभवाला आला नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहेत.

महिलांनाही निवडणूक साहित्य जमा करण्याच्या नावाखाली रात्री १२ वाजेपर्यंत थांबवून ठेवले होते. विरार, वसई, कल्याण, डोंबिवली अशा लांब राहणाऱ्या महिलांना याचा त्रास झाला, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

असह्य उकाडा, त्यात पंखेही बंदकुर्ला येथे भर उन्हात प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यातच मांडवातील पंखेही चालत नव्हते. तिथे एका कर्मचाऱ्याला चक्कर आल्याने रुग्णालयात न्यावे लागले, असा अनुभव एका कर्मचाऱ्याने सांगितला.  

मतदान केंद्रावरच काढावी लागली अख्खी रात्रमतदानाच्या आदल्या दिवशीपासूनच ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका या कर्मचाऱ्यांना बसू लागला होता. रविवारी (१९ मे) सकाळी ७ वाजल्यापासून प्रशिक्षण आणि मतदान केंद्रावरील तयारीकरिता कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. काही ठिकाणी मतदानाची तयारी करण्यात उशीर झाल्याने पुरुष कर्मचाऱ्यांनी रविवारची रात्र निवडणूक केंद्रावरच काढली. मतदानाच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे मंगळवारी ५-६ वाजेपर्यंत हे हाल सुरू होते.

नाश्ता-जेवण आले, पण कुणी भलतेच घेऊन गेले- कर्मचाऱ्यांच्या नाश्ता, जेवणाकरिता एकत्रित सोय केली जाते. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून आपल्या वाट्याचे जेवण घेऊन जायचे असते. - परंतु, टिळक नगर म्युनिसिपल स्कूल येथे काम करणाऱ्या ९० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेला नाश्ता, जेवण कुणीतरी भलतेच घेऊन गेल्याने या कर्मचाऱ्यांना दिवसभर उपाशीपोटी ड्यूटी बजावावी लागली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग