शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

छावणीच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या २३ गायी, १० बैलांचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2016 18:10 IST

छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 05 -  छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या सुमारे ४० जनावरांवर पशुसंवर्धन चिकित्सालय, मनपा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर उपचार सुरू केले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ८ उघडकीस आली.  या जनावरांना उपाशीपोटी ठेवल्याने अथवा विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला. 
 पोलिस आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, छावणीमध्ये दर गुरूवारी गुरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारात म्हशी आणि गायी,बैल, शेळ्या ,मेंढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. विशेषत: मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील जनावरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील व्यापारी आणि पशुमालक येथे जनावरांची खरेदी विक्री करीत असतात. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणण्यात येणा-या गायी,म्हशी आणि बैलांना ट्रक, टेम्पोमध्ये अमानुषपणे कोंबलेल्या असतात. सुमारे तीन दिवसांचा त्यांचा हा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान या जनावरांना खाण्या-पिण्यास दिली जात नाही. 
शिवाय दूरच्या प्रवासादरम्यान त्यांना वाहनात नीट बसता येत नाही आणि उभेही राहता येत नाही, असह्य वेदना सहन करीत त्यांना येथे आणल्या जाते. यामुळे अनेक जनावरे आजारी पडतात. अशाचप्रकारे दोन दिवसापूर्वी गुजरात आणि मध्यप्रदेशातील व्यापाºयांनी सुमारे शंभरहून अधिक गायी आणि बैल येथे वेगवेगळ्या वाहनातून आणले होते. गुरूवारच्या आठवडी बाजारात 
विक्री करण्यासाठी ही जनावरे आणण्यात आली होती. आठवडी बाजारातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना दावणीला बांधून ठेवण्यात आली होती. या शेडमध्ये सुमारे दोनशेहून अधिक जनावरे होती. यापैकी२३ गायी आणि १० बैल हे बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आणि आणखी तेवढीच जनावरे गंभीर आजारी असल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच महानगर पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त माणिक बाखरे, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, छावणी ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. 
 
तीसगाव शिवारात शवविच्छेदन
पशुंच्या मृत्यूचे अचूक  कारण समोर यावे,याकरीता सर्व मृत पशुंचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तीसगाव येथे शवविच्छेदन केले जात आहे. यासाठी पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे तज्ज्ञांचे पथक  सहभागी होणार आहे. शिवाय मृत पशुंचा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
 
आजारी पशुवर उपचार
याची माहिती खडकेश्वर येथील सर्वपशुचिकित्सालयास कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त एम.एन. आठवले, सह आयुक्त डॉ. जी.एन.पांडे, डॉ.एस.के. चंदेल,पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे डॉ.प्र्रशांत चौधरी, डॉ. डी.बी. कांबळे, डॉ. दिलीप भालेराव, डॉ.विलास काळे,डॉ.अतिश कुलकर्णी, डॉ. आश्रुबा गाढवे,डॉ.लिंबाजी वाघमारे यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले.
 
मरण पावलेल्या पशुंची आणि आजारी पशुंची अवस्था पाहुन चाºयातून विषबाधा झाल्याने अथवा तीन ते चार दिवस विना अन्न पाण्यामुळे तडफडून त्यांचा अंत झाला,असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी शवविच्छेदानानंतरच त्यांच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. यामुळे सर्व आजारी गायी आणि बैलांवरविषबाधेसह अन्य उपचार सुरू असल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले. सध्या आजारी  पशुंना प्रत्येकी पाच सलाईन लावण्यात येत आहे.या उपचारांना ही जनावरे प्रतिसाद देत असल्याचे ते म्हणाले. 
 
छावणी बाजाराच्या कंत्राटदारांवर गुन्हा
छावणीतील आठवडी बाजारात दाखल होणाºया सर्व जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारीही आठवडी बाजाराचाकंत्राटदार यांची आहे. यामुळे जनावरांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार अजीम देशमुख यांच्याविरोधात छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दिली.