शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

रेती-खडीचे २२८ ट्रक जागेवरच

By admin | Updated: March 2, 2017 03:23 IST

गौण खनिज माफियांकडून मोठ्याप्रमाणात रेती, खडी आदी गौण खनिजांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा प्रयत्न माफियांनी केला

सुरेश लोखंडे,ठाणे- जिल्ह्यात आचारसंहिता लागू होताच गौण खनिज माफियांकडून मोठ्याप्रमाणात रेती, खडी आदी गौण खनिजांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा प्रयत्न माफियांनी केला. मात्र, तो फोल ठरवून अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातून २२८ ट्रक जप्त केले. परंतु, या पुढे अवैध वाहतूक करणार नाही, असे हमीपत्र व दंड भरण्यास संबंधित चालकमालक टाळाटाळ करीत आहेत. अन्य कोणाच्याही दबावाला न जुमानता सुमारे १५ दिवसांपासूनही वाहने जिल्ह्यात ठिकठिकाणी उभी आहेत. दंड भरणे आणि पुन्हा असे करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतल्यानंतरच या ट्रक सोडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने ‘लोकमत’ला सांगितले. रेती, खडी, वाळू याचे अवैध उत्खनन कोणत्याही परिस्थितीत थांबविण्याची मोहीम जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हाती घेतली आहे.आचारसंहितेचा गैरफायदा घेउन माफियांनी रेती, खडी, डबर, रिबीट आदींचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दबा धरून बसलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न फोल ठरवून २२८ ट्रक जप्त केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. ही वाहने उप विभागीय अधिकारी कार्यालये, तहसील, पोलीस ठाणी येथे उभी करून ठेवली आहेत. या वाहनाच्या मालकांकडून अवैध वाहतूक करणार नाही आणि तसे केल्यास वाहन शासन जमा करणार, असे हमीपत्र व बंधपत्र देण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. याशिवाय त्यांना निश्चित केलेला दंडही भरावा लागणार आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी सांगितले. >सात कोटींचा दंड वसूलमागील ११ महिन्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या २,८४७ ट्रक पकडले आहेत. त्यांच्याकडून सात कोटी पाच लाख १८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या निवडणूक कालावधीच्या ८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ठाणे तहसीलदारांनी ५१ ट्रक, भिवंडीत ४०, कल्याणला २४, शहापूरला २२, अंबरनाथ आठ, मुरबाड नऊ, उल्हासनगरला नऊ आणि जिल्हा दक्षता पथकाने ६५ ट्रक पकडले.