शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २२ वर्षांनी शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 05:46 IST

नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

मुंबई : नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.या आरोपीस नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून न्या. इंद्रजीत महंती व न्या. श्रीमती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या खेरीज बबडू यास एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. तो वसूलझाला तर ती रक्कम बलात्कारपीडित मुलीस भरपाई म्हणून द्यावी, असाही आदेश दिला गेला. शिक्षा भोगण्यासाठी आरोपीने एक महिन्यात सत्र न्यायालयापुढे हजर व्हावे, असाही आदेश दिला गेला.न्यायालयाने असेही निर्देश दिले की, नाशिक जिल्हा विधी सेवा समितीने ही पीडित मुलगी आज कुठे आहे याचा शोध घ्यावा आणि बलात्कारित स्त्रियांना सरकारकडून भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने जी योजना तयार केली आहे त्यानुसार भरपाई मिळण्यासाठी तिच्याकडून अर्ज भरून घ्यावा. त्या अर्जावर सहानुभूतीने निर्णय घेतला जावा, असेही खंडपीठाने सांगितले.या पीडित मुलीचे आई व वडील दोघेही शेतमजूर म्हणून काम करायचे. १ डिसेंंबर १९९६ रोजी तिच्या मोठ्या भावाच्या पाठीत उसण भरली म्हणून वडील त्याला घेऊन इस्पितळात गेले व आई मजुरीसाठी व लाकडे आणण्यासाठी घराबाहेर पडली. डोके खूप डोके दुखू लागले म्हणूनही मुलगी गावातील किराणा मालाच्या दुकानात गेली व आपल्याकडे पैसे नाहीत, पण काही तरी औषध द्या, अशी तिने विनंती केली. ते दुकान बबडूच्या वडिलांचे होते व त्यावेळी दुकानावर बबडू बसला होता. दुकानाच्या मागच्या बाजूला त्यांचे घर होते. मुलगी एकटीच आहे, हे पाहून बबडूने तिच्यावर बलात्कार केला. कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलगी घरी गेली व वडील आणि आई येईपर्यंत बाहेर बसून राहिली.न्यायालयाने दोन निष्कर्ष काढून त्यावरून संशयाचा फायदादेत बबडूला निर्दोष ठरविले होते. एक, घटनेच्या वेळी या मुलीचे वय किमान १६ वर्षे होते व दोन, बबडूने तिच्या संमतीने तिच्याशी हे शरीरसंबंधकेले. खंडपीठाने हे दोन्हीनिष्कर्ष चुकीचे ठरवत बबडूला दोषी धरले.दयेची विनंती केली अमान्यहा गुन्हा करताना बबडू १९ वर्षांचा होता. त्यानंतर अपिलात एवढी वर्षे गेली आहेत. त्यामुळे शिक्षा देताना त्याला दया दाखवावी, ही विनंती अमान्य करून खंडपीठाने नमूद केले की, या घटनेला २२ वर्षे होऊन गेली असली तरी फौजदारी न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी आरोपीस शक्य तेवढी शक्य शिक्षा देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय