शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात २२ रुग्णालयात आढळले ५२ डेंग्यू संशयित रुग्ण

By admin | Updated: September 19, 2016 22:21 IST

शहरातील चार मोठी रुग्णालये वगळता इतर २२ रुग्णालयांत डेंग्यू संशयित ५२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मिळाली आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १९ : शहरातील चार मोठी रुग्णालये वगळता इतर २२ रुग्णालयांत डेंग्यू संशयित ५२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मिळाली आहे, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम यांनी दिली. डेंग्यूच्या साथ निर्मूलनासाठी डास मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, चार दिवसांचे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. डेंग्यूच्या साथीवरून महापालिकेच्या सभेत हंगामा झाला होता.

साथीबाबत आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीवर नगरसेवकांचा आक्षेप होता. नगरसेवकांनी शहरात कोठे कोठे रुग्ण आढळत आहेत, याचा पोलखेल केला होता. त्यावर आयुक्त विजयकुमार काळम यांनी रविवारी आरोग्य विभाग व झोन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. सुटीमुळे शासकीय रुग्णालय, अश्विनी, यशोधरा, मार्कंडेय या चार मोठ्या रुग्णालयांची यादी मिळाली नाही.

पण इतर २२ रुग्णालयांची आकडेवारी तपासल्यावर १४४ फिव्हरच्या रुग्णांपैकी ५२ रुग्ण डेंग्यू संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी व धुराळणीसाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले असून, २४ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण शहर पिंजून काढण्यात येणार आहे. त्यानंतर २६ सप्टेंबरपासून दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे. आजपासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून, स्वत: आयुक्त काळम यांनी एसटी डेपो, प्रभाकर महाराज वस्ती, राजस्वनगर, आदित्यनगर, बंजारा सोसायटी, विजापूर रोड, जयभवानी बाग, होम मैदान येथील मोहिमेच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केल्याचे सांगितले.१७२ कर्मचाऱ्यांचे पथकशहरातील आठ झोनसाठी कीटकनाशक फवारणीसाठी ३१ व धुराळणीसाठी २२ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. दररोज सकाळी साडेसात ते दुपारी बारा वाजेपर्यंत फवारणीचे काम चालेल. डेंग्यूचा डास या काळात आराम करीत असतो. नेमकी हीच वेळ साधून हे काम उरकण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन डास उत्पत्तीबाबत जनजागरण करणार आहेत. धुराळणी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत करण्यात येणार आहे. या पथकावर निगराणी ठेवण्यासाठी आयुक्तांसह १५ वरिष्ठ अधिकारी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक झोन वॉर्ड, नगरसेवक व कर्मचारी कोण कोण आहेत, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाच लाखांचे कीटकनाशक खरेदीसोमवारी तातडीने पुण्याहून पाच लाखांचे कीटकनाशक खरेदी करण्यात आले आहे. महापालिकेकडे एक महिना पुरेल इतपत साठा होता. पण आता शहरात मोहीम घेण्यात येणार असल्याने कीटकनाशकाची गरज वाढणार आहे. फवारणीचे काम वेगात होण्यासाठी दोन ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. ट्रॅक्टर आणखी वाढविण्यात येणार असून, याद्वारे शाळा, मंदिरे, मैदान, बागा, बस व रेल्वे स्थानक, नाले, गटारीत कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या चार संघटना व जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकांची या कामासाठी मदत मागण्यात आली आहे.दवाखान्यांची दररोज तपासणीखासगी दवाखान्यांत दररोज नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी २0 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉक्टर दवाखाने व लॅबमध्ये जाऊन संशयितांचे अहवाल तपासून पाहणार आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने मनपाच्या पथकास उपलब्ध करावेत. हे नमुने एनआयव्हीकडे पाठविले जातील, असे आयुक्त काळम यांनी सांगितले. मनपाच्या शाळांमधील शिक्षकांनाही मोहिमेत सहभागी करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. संशयित रुग्णास उपचारासाठी मदत हवी असल्यास नियंत्रण कक्षाच्या २३२३७00 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.