शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:49 IST

जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदलल्याच्या संशयातून आधी आई-वडिलांनी तिला नाकारले. त्यानंतर डीएनए चाचणीत ती तान्हुली त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले खरे पण ‘ती’च्या मागचा भोग काही संपत नाही.

बीड : जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदलल्याच्या संशयातून आधी आई-वडिलांनी तिला नाकारले. त्यानंतर डीएनए चाचणीत ती तान्हुली त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले खरे पण ‘ती’च्या मागचा भोग काही संपत नाही. रुग्णालयातील रजिस्टरवर नोंद केल्याप्रमाणे आम्हाला मुलगाच झाला होता, असे सांगत आई-वडिलांनी सांभाळ करण्यास असमर्थता दर्शविल्याने शनिवारी तिची रवानगी औरंगाबादमधील शिशुगृहात करण्यात आली.छाया राजू थिटे (रा. भंडारी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. कुप्पा ता.वडवणी, जि. बीड) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता चिमुकलीला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात चुकून मुलगा अशी केली. वजन कमी असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला इतरत्र हलविण्याचासल्ला दिला.त्यानुसार बाळाला खासगी रूग्णालयात दाखल केले. दहा दिवस उपचारानंतर २१ मे रोजी बाळाला आईच्या स्वाधीन केले. परंतु, मुलगा नसून ती मुलगी असल्याचे समजताच आईने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी बाळाचे व थिटे दाम्पत्याचे रक्त घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले.त्याचा अहवाल प्राप्त होताचते बाळ थिटे यांचेच असल्याचेस्पष्ट झाले.त्यानंतर शुक्रवारी बाळाला थिटे दाम्पत्याच्या स्वाधीन करण्यात आले. रात्रभर त्याचा सांभाळ केल्यानंतर शनिवारी त्यांनी सांभाळण्यास आपण असमर्थ असल्याचा जबाब बालकल्याण समितीसमोर दिला. समितीचे अध्यक्ष डॉ.अभय वणवे यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला मात्र ते नकारावर ठाम राहिले.एका चुकीमुळे ‘ती’चे हालजिल्हा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी ऐवजी मुलगा असे लिहिण्यात आले. त्यानंतर थिटे दाम्पत्याच्या हाती मुलगी सोपविली गेली. आपल्याला मुलगा झाला होता, मुलगी नाही, अशा समजुतीने त्यांनी बाळास स्वीकारण्यास नकार दिला. डीएनए अहवालानंतर हे बाळ आपलेच असल्याचे उघड होऊनही त्यांनी ‘ती’ला नाकारले. दोषी डॉक्टर व परिचारिकांमुळेच या चिमुकलीच्या नशिबी अनाथाचे जीवन आले.थिटे यांना पहिलीही मुलगीच : छाया राजू थिटे यांना अडीच वर्षांची एक मुलगी आहे. मजुरीसाठी हे दाम्पत्य हिंगोलीहून बीडला आलेले आहे. आधीही मुलगीच आणि आताही मुलगीच झाल्याने त्यांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. आपला डीएनएवर विश्वास नाही. आम्हाला मुलगाच झाला होता, यावर थिटे दाम्पत्य ठाम आहे.

टॅग्स :BeedबीडMaharashtraमहाराष्ट्र