शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना डासमुक्त झोप, २.१९ लाख मच्छरदाण्या : टास्कफोर्सचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.एका मच्छरदाणीची किंमत ५०० रुपये असून तिच्यावर डास बसल्यानंतर तो मरतो. त्यामुळे एकप्रकारे डास निर्मूलनदेखील होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १९ हजार, चंद्रपूर - २३ हजार, गोंदिया २० हजार, ठाणे १० हजार, पालघर १० हजार, रायगट २० हजार, सिंधुदुर्ग ७ हजार आणि नंदुरबार १० हजार मच्छरदाण्यांचे वाटप सध्या सुरू आहे. एका कुटुंबातील दोन जणांमागे एक मच्छरदाणी दिली जाते. हिवतापाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेअशा मच्छरदाण्यांच्या वाटपाचा आग्रह धरला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झाले नाही इतके मोठे मच्छरदाण्यांचे वाटप हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता केले जात आहे.मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र -राज्य मोतीबिंदूमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून येत्या २० महिन्यांत १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या योजनेचे मुख्य समन्वयक म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार